Hashtagintro

Suryakumar Yadav : 5 Six 6 Four, सूर्यकुमार यादवचं तुफानी कमबॅक, अवघ्या 15 बॉलमध्ये समोरच्या टीमची वाट लावून टाकली

Suryakumar Yadav : 5 Six 6 Four, सूर्यकुमार यादवचं तुफानी कमबॅक, अवघ्या 15 बॉलमध्ये समोरच्या टीमची वाट लावून टाकली

टी20 वर्ल्ड कप 2026 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. कारण तो फॉर्ममध्ये नव्हता. पण आता त्याने मैदानावर जोरदार कमबॅक केलं आहे. आयपीएल 2026 नंतर पहिल्यांदा सूर्यकुमार सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या रुपाने मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळतोय. सूर्याने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. मुंबईच्या या विजयात कॅप्टन सूर्यकुमार यादवने महत्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमार यादव 21 चेंडूत नाबाद 60 धावांची तुफानी इनिंग खेळला. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2026-27 टुर्नामेंटला आज 14 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. SMAT च्या चालू सीजनमध्ये मुंबईचा हैदराबाद विरुद्ध पहिला सामना झाला. कोलकात्याच्या जादवपुर यूनिवर्सिटी कॅम्पस सेकंड ग्राउंडमध्ये एलीट ग्रुप डी चा सामना झाला. या मॅचमध्ये मुंबईने हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी 173 धावांचं टार्गेट मिळालं होतं. मुंबईने 13.1 ओव्हरमध्येच विजयी लक्ष्य गाठवलं.

सूर्यकुमार यादव 21 चेंडूत नाबाद 60 धावांची तुफानी इनिंग खेळला. त्यात पाच सिक्स आणि 6 फोरचा समावेश आहे. दीर्घकाळानंतर मैदानात उतरलेल्या सूर्याची फलंदाजी पाहून तो आऊट ऑफ फॉर्म आहे असं अजिबात वाटलं नाही. चौथ्या नंबरवर बॅटिंग करायला आलेल्या सूर्याने 285.71 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 6 फोर आणि पाच सिक्स मारले. सूर्यकुमार यादवला मुशीर खान कडून चांगली साथ मिळाली. मुशीर आणि सूर्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी झाली.

शिवम दुबेचही योगदान

मुशीरने 6 चौकार आणि तीन षटकारांसह 24 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. शिवम दुबेने या मॅचमध्ये बॅट आणि बॉलने चांगलं योगदान दिलं. त्याने अवघ्या 5 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. याआधी गोलंदाजी करताना चार ओव्हर्समध्ये 31 धावा देऊन दोन विकेट काढल्या. हैदराबादची टीम टॉस हरली. पहिली बॅटिंग करताना हैदराबादची संपूर्ण टीम 20 ओव्हर्समध्ये 172 रन्सवर ऑलआऊट झाली. अभिरथ रेड्डीने सर्वात जास्त 35 धावांचं योगदान दिलं. कोडिमेला हिमतेजाने (25 रन्स) आणि चामा मिलिंद (22 रन्स) उपयुक्त इनिंग खेळले. मॅक्सवेल स्वामीनाथनने मुंबईकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

मुंबईची प्लेइंग 11 : अंगकृष रघुवंशी, साईराज पाटिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक तमोरे (विकेटकीपर), मुशीर खान, शार्दुल ठाकुर, सरफराज खान, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर आणि मॅक्सवेल स्वामीनाथन.

हैदराबादची प्लेइंग 11 : अमन राव पेराला, तन्मय अग्रवाल, अभिरथ रेड्डी, कोडिमेला हिमतेजा, भावेश सेठ (विकेटकीपर), चामा मिलिंद (कर्णधार), तनय त्यागराजन, प्रणव वर्मा, वेद रेड्डी, अजय देव गौड आणि चिन्तला रक्षण रेड्डी.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language