Hashtagintro

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला; अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना

अंबरनाथ : अंबरनाथ परिसरातून येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशाखा गायकवाड ही तरुणी कामावरून घरी जात असताना एका तरुणाने गुरुद्वारासमोर गाठून तिला हेमंत गुमाणे या तरुणाने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ पश्चिम येथील हाउसिंग बोर्ड परिसरात शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सायंकाळी ही घटना घडली. तरुणी संध्याकाळी कामावरून घरी परतत होती. यावेळी रस्त्यावर हेमंत याने तरुणीला गाठून गुरुद्वारासमोर अडवलं. त्यानंतर थेट तिच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. अतिशय क्रूरतेने तिच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तिचं पोट, हात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेनंतर जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी विशाखाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
https://www.prahaar.in/2026/11/15/india-vs-new-zealand-a-thrilling-victory-for-team-india-they-defeat-new-zealand-by-22-runs-to-win-the-odi-series-2/
या हल्ल्यानंतर हेमंत घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत. फरार हल्लेखोराचा उल्हासनगर पोलीस कसून शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हा हल्ला करण्यात आला आहे. भरस्त्यात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच या घटनेमुळे अंबरनाथमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language