Hashtagintro

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘ओटीएस’ कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) साठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 1 लाख 69 हजार 820 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (ओटीएस) आणि प्रोत्साहन असे तीन प्रमुख घटक आहेत. पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीअंतर्गत 25.81 लाख शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 20.72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/message-of-environmental-conservation-reaches-schools-5-special-environment-chariots-to-travel-across-maharashtra/
‘ओटीएस’ योजनेचे नियम आणि भरणा प्रक्रिया काय?
दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता योजनेअंतर्गत, दोन लाख रुपयांवरील कर्जातील शेतकऱ्याचा हिस्सा संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे. यादीत शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँक आणि शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, 31 मार्च 2026 अखेरची थकबाकी, ओटीएस थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाचा लाभ यांचा तपशील आहे. ही यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे.
ज्या शेतकऱ्यांचे एकाच बँकेत कर्जखाते आहे, त्यांनी यादीतील रक्कम थेट त्याच कर्जखात्यात भरावी. एकापेक्षा जास्त कर्जखाती असल्यास कोणत्याही एका खात्यात रक्कम भरता येईल, मात्र देय रकमेपेक्षा जास्त रक्कम भरू नये. बँकेकडून भरलेल्या रकमेची माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अद्ययावत होईल. रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर थकबाकी अद्ययावत झाल्याच्या 3 दिवसांनंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा सुरू होईल. दोन लाख रुपयांवरील कर्जाचा स्वतःचा हिस्सा भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2027 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/maharashtra-triumphs-at-the-pm-svanidhi-awards-2026-state-bags-5-national-awards/
कोणत्या विभागात किती शेतकरी पात्र?
पहिल्या ओटीएस यादीत नाशिक विभागात सर्वाधिक 48,379 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागात 40,946, छत्रपती संभाजीनगर विभागात 39,597, अमरावती विभागात 25,917, नागपूर विभागात 12,002 आणि कोकण विभागात 2,979 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बँकांकडून मिळणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण पुढेही सुरू राहणार असल्याने पुढील याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होतील.

ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि विशेष सवलत
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. दोन्ही अटी पूर्ण करून निकषांनुसार रक्कम भरल्यावरच शासनाचा लाभ मिळेल. तसेच मृत, वयोवृद्ध आणि बायोमेट्रिकमध्ये अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language