मुंबई: वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने जोरदारा कमबॅक केलं आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या होत्या. या धावांचा पल्ला भारताने ओलांडला असून आता धावांची आघाडी घेत आहे. या सामन्यात सलामीला आलेल्या केएल राहुलने संयमी फलंदाजी करत टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. त्याला यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कलची उत्तम साथ लाभली. या सामन्यात केएल राहुलने शतकी खेळी करत एक ऐतिहासिक नोंद केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केएल राहुल नाबाद 52 धावांवर तंबूत परतला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्याची कामगिरी कशी होते? याकडे लक्ष लागून होतं. त्याने क्रीडाप्रेमींना नाराज केलं नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही त्याने संघाला आवश्यक अशी फलंदाजी केली. केएल राहुलने 207 चेंडूंचा सामना केला आणि शतक पूर्ण केलं. केएल राहुलच्या कसोटी कारकिर्दीतील हे 13वं शतक आहे. तर न्यूझीलंडच्या भूमीववर आणि न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलचं पहिलंच शतक आहे. या शतकासह केएल राहुलने वर्ल्ड क्रिकेटच्या रेकॉर्ड बूकमध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरात नोंदवलं आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/asia-cup-rising-stars-2026-ind-vs-nep-india-trounce-nepal-in-the-opening-match-of-the-group-stage-tilak-and-kushagra-score-centuries/
वेलिंग्टनमध्ये शतक ठोकल्यानंतर केएल राहुल SENA (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध विक्रम नोंदवला आहे. या देशांविरुद्ध सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा भारताचा पहिला सलामीवीर ठरला आहे. यासह केएल राहुल आशियातील काही निवडक फलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे. या फलंदाजांनी या देशांविरुद्ध कसोटीत शतक ठोकलं आहे. सेना देशांविरुद्ध मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सईद अनवर, राहुल द्रविड,, यूनिस खान, कुमार संगकारा, विराट कोहली आणि केएल राहुलने शतक ठोकलं आहे.
KL Rahul departs after scoring a brilliant 136 👌👌
#NZvIND https://t.co/0yPigeI2i2
— BCCI (@BCCI) November 21, 2026
केएल राहुलने सेना देशातील कठीण परिस्थितीत सातवं शतक ठोकलं आहे. या यादीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर आघाडीवर आहेत. सुनिल गावस्कर यांनी ओपनर म्हणून सेना देशात 8 शतकं ठोकली आहेत. आता या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी फक्त एक शतक दूर आहे. सुनिल गावस्कर 8, केएल राहुल 7, यशस्वी जयस्वाल 3, विनू मांकड 3, वीरेंद्र सेहवाग 3, रवि शास्त्री 3 शतकं ठोकली आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/20/rising-stars-asia-cup-2026-abhishek-sharma-fails-in-odi-match-his-innings-against-nepal-ends-in-just-13-balls/
Source: Prahaar News
