Hashtagintro

Actress Marriage: 51 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं तिसरं लग्न, पाकिस्तानी उद्योजकासोबत थेट मक्कामध्ये निकाह, हनीमूनबद्दल स्पष्टच म्हणाली

Actress Marriage:  51 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं तिसरं लग्न, पाकिस्तानी उद्योजकासोबत थेट मक्कामध्ये निकाह, हनीमूनबद्दल स्पष्टच म्हणाली

Actress Third Marriage: सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एक अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री वयाच्या 51 व्या वर्शी तिसरं लग्न केलं आहे. अभिनेत्रीने प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवलं पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक चढ – उतारांचा सामना केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या तिसऱ्या लग्नामुळे हेडलाईन्समध्ये आहे. अभिनेत्री तिसरं लग्न पाकिस्तानी उद्योजक मिर्झा इश्तियाक बेग याच्यासोबत केलं आहे… पाकिस्तानी उद्योजकासोबत लग्न करत अभिनेत्रीने तिसरा संसार थाटला आहे…

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, पाकिस्तानी अभिनेत्री किरण खान आहे. किरण खान हिने तिसरं लग्न पाकिस्तानी उद्योजक मिर्झा इश्तियाक बेग याच्यासोबत केलं आहे… दोघांनी मक्कामध्ये साध्या पद्धतीत लग्न केलं. दरम्यान एक शोमध्ये किरण खान हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

 

खासगी आयुष्य आणि लग्नाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं की, लग्नाबद्दल एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे, लग्न फक्त हनीमूनच्या दिवसांसारखं असतं. जेथे सर्वकाही दिसायला चांगलं असतं दोघांमध्ये फक्त प्रेम असतं… या त्याच गोष्टी आहेत, ज्या कमी वयात लग्न केल्यामुळे मला कळत होत्या… या मानसिकतेमुळे, लोकांना अनेकदा असं वाटू लागतं की कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय योग्य नव्हता. मात्र, प्रत्यक्षात लग्नानंतरचा काळ ज्याला ‘हनिमून पिरियड’ म्हटलं जातं, तो खरं तर जुळवून घेण्याचा टप्पा असतो, कारण भिन्न विचारसरणी असलेली दोन माणसे एकत्र राहण्यास सुरुवात करत असतात.’

पुढे अभिनेत्री म्हणते, ‘या काळात तुम्ही एकमेकांबद्दल चांगल्या – वाईट गोष्टी जाणून घेता. ‘हनिमून कालावधी’कडे जुळवून घेण्याचा एक टप्पा म्हणून पाहिलं पाहिजं. एकदा का तुम्ही एकमेकांना नीट समजून घेतलं की, मग तुम्ही या टप्प्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त, संवाद साधणं कधीही थांबवू नका; तुम्ही तुमचे विचार आणि भावना नेहमी शांत आणि मोकळ्या मनाने व्यक्त केल्या पाहिजेत.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language