
#TrendingBaby: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या गाण्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीचे उमेश कुमावत यांच्या नव्या ‘ट्रेंडिंग बेबी’ या गाण्याची विशेष चर्चा रंगली आहे. या गाण्याची चर्चा आता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांनी उमेश कुमावत यांचं ‘ट्रेंडिंग बेबी’ हे गाणं ऐकलं असून, त्यातील एका खास ओळीवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. गाण्यातील एक ओळ ऐकून देवेंद्र फडणवीस हसले. त्यामुळे या गाण्याची चर्चा आणखी रंगली आहे.
उमेश कुमावत यांच्या ‘ट्रेंडिंग बेबी’ या गाण्यातील ‘Full Throttle, You Are fast baby, You are Trending in my Heart बेबी’ या ओळीने मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं. या हटके आणि मजेशीर शब्दरचनेवर देवेंद्र फडणवीस हसले. गाण्यातील इंग्रजी शब्दांचा वापर, त्याचा अंदाज आणि ‘Trending in my Heart Baby’ ही ओळ यामुळे हा प्रसंग खास ठरला.
हिप-हॉप, रॅप आणि रोमँटिक गाण्याचा तडका!
‘ट्रेंडिंग बेबी’ हे गाणं आजच्या Gen-Z पिढीची आवड लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. हिप-हॉप, रॅप आणि रोमँटिक संगीताचा अनोखा संगम या गाण्यात पाहायला मिळतो. वेगळ्या धाटणीचे संगीत, आकर्षक बीट्स आणि लक्षात राहतील असे शब्द हे या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. पारंपरिक गाण्यांपेक्षा काहीतरी वेगळं ऐकू इच्छिणाऱ्या तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीत वाजणार ‘ट्रेंडिंग बेबी’?
नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची तयारी सुरू झाली आहे. अशा वेळी पार्टीचा मूड सेट करण्यासाठी एखादं धमाकेदार गाणं आवश्यक असतं. ‘ट्रेंडिंग बेबी’चा हिप-हॉप आणि रॅपचा अंदाज पाहता हे गाणं पार्टीसाठी नवा पर्याय ठरू शकतं. त्यातच मुख्यमंत्र्यांनीही गाणं ऐकून दिलेली खास प्रतिक्रिया यामुळे उमेश कुमावत यांच्या या नव्या गाण्याची चर्चा आता अधिक रंगणार आहे.
विविध प्लॅटफॉर्म्सवर गाणं ऐकू शकता-
- युट्यूबवर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Apple Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Spotify वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Amazon Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
- Gaana वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
Source: TV9 Marathi Entertainment
