
टेस्ट क्रिकेटच्या 149 वर्षांच्या दीर्घ इतिहासात पहिल्यांदाच एक असा रेकॉर्ड बनला आहे, ज्याची कल्पना कदाचितच कोणी केली असेल. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या टीमना आजपर्यंत जे जमलेलं नाही, ते झिम्बाब्वे क्रिकेट टीमने करुन दाखवलं आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे मध्ये कसोटी सामना झाला. या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये झिम्बाब्वेने 500 पेक्षा जास्त धावा करुन नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. याआधी टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये कुठल्या टीमच्या नावावर इतक्या धावा नाहीयत. झिम्बाब्वेने शारजाह टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये तुफानी बॅटिंग केली. त्यांनी स्कोर बोर्डवर 504 धावा लावल्या. प्रत्युत्तर अफगाणिस्तानचा पहिला डाव 514 धावांवर आटोपला. पण खरा इतिहास झिम्बाब्वेने दुसऱ्या इनिंगमध्ये रचला. त्यांनी पाच विकेटवर 523 धावा बनवून डाव घोषित केला.
अफगाणिस्तान विरुद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये झिम्बाब्वेने 500 पेक्षा जास्त धावा करुन वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. याआधी टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये कुठल्याही टीमने इतक्या धावा केल्या नव्हत्या. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे, जेव्हा कुठल्या टीमने एकाच टेस्ट मॅचच्या दोन इनिंगमध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या सामन्याचा निकाल लागला नाही. ही कसोटी अनिर्णीत राहिली. पण रेकॉर्ड झाला. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी हे मोठ यश आहे.
रेकॉर्ड 1541 धावा
धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात फलंदाजांचा दबदबा होता. एकूण सहा सेंच्युरी या कसोटी सामन्यात पहायला मिळाल्या. झिम्बाब्वेकडून पहिल्या इनिंगमध्ये ब्रेंडन टेलरने 131 रन्स केल्या. ब्रायन बेनेटने 128 धावा केल्या. टेलरला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. दुसऱ्याडावात अनुभवी 41 वर्षीय क्रेग इरविनने नाबाद 206 धावा केल्या. सोबतच इरविन टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी झळकवणारा जगातील तिसरा वयोवृद्ध क्रिकेटपटू बनला आहे. इरविन सोबतच वेस्ली मधेवेरेन नाबाद 100 धावा केल्या. टेस्ट करिअरमधील हे पहिलं शतक आहे. अफगाणिस्तानकडून पहिल्या इनिंगमध्य रहमत शाह, सेदिकुल्लाह अटल आणि रहमानुल्लाह गुरबाजने तीन शतकं झळकवली. पाच दिवसाच्या या मॅचमध्ये एकूण 25 विकेट गेल्या. रेकॉर्ड 1541 धावा झाल्या.
Source: TV9 Marathi National
