Hashtagintro

Ahan Shetty: ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर अहान शेट्टी पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘सनकी’ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Ahan Shetty: ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर अहान शेट्टी पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; ‘सनकी’ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Ahan Shetty: अभिनेता अहान शेट्टी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनचा तडका देण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर अहान आता त्याच्या आगामी ‘सनकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे. प्रेमकथा, भावना आणि जबरदस्त अ‍ॅक्शनचा मिलाफ असलेला हा चित्रपट त्यामुळे चर्चेत आला आहे.

‘सनकी’ हा चित्रपट केवळ अ‍ॅक्शनपुरता मर्यादित नसून, त्याच्या केंद्रस्थानी एक प्रेमकथा असणार आहे. या कथेत भावनिक प्रसंगांसोबतच रॉ आणि थरारक अ‍ॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, चित्रपटाची नेमकी कथा आणि त्यातील व्यक्तिरेखांविषयी निर्मात्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. चित्रपटाशी संबंधित माहिती टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची निर्मात्यांची योजना आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई करणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘रुस्तम’ आणि ‘मिशन रानीगंज’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे ‘सनकी’मध्येही दमदार कथा आणि थरारक प्रसंगांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाचं लेखन ज्ञानेंद्र वासुदेव यांनी केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

‘बॉर्डर 2’मधील अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अहान शेट्टी आगामी चित्रपटांची निवड विचारपूर्वक करत असल्याचं सांगितलं जात आहे. ‘सनकी’नंतर तो विक्रम भट्ट यांच्या ‘1920 कोल्ड विंटर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचे आणखी काही चित्रपट 2027 मध्ये फ्लोअरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात अहानच्या चाहत्यांना त्याचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळू शकतात.

‘सनकी’ची निर्मिती वी द पीपल, रोअरिंग रिव्हर प्रॉडक्शन्स आणि पाल्स अँड पीअर्स एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थांकडून केली जात आहे. दिग्दर्शक टिनू सुरेश देसाई आपल्या मोठ्या टीमसह भोपाळमध्ये दाखल झाले असून, चित्रीकरणापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. चित्रपटाची कथा, इतर कलाकार आणि कथानकातील महत्त्वाचे तपशील सध्या गुलदस्त्यातच आहेत. हा चित्रपट 2027 च्या पहिल्या सहामाहीत चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. प्रेम, भावना आणि अ‍ॅक्शन यांचा संगम असलेला ‘सनकी’ अहानच्या कारकिर्दीत किती महत्त्वाची भूमिका बजावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language