Hashtagintro

Anushka Pimputkar: अविनाश नारकरांसोबतचा Video चुकीच्या पद्धतीने शेअर करताच अभिनेत्री संतापली, थेट म्हणाली…

Anushka Pimputkar: अविनाश नारकरांसोबतचा Video चुकीच्या पद्धतीने शेअर करताच अभिनेत्री संतापली, थेट म्हणाली…

प्रत्येक सिनेमा हा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे जोरदार प्रमोशन केले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक वापरल्या जातात. कधी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी कधी काही स्टंट केले जातात तर कधी उत्सुकता वाढवणारे व्हिडीओ शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरचा होता. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेते अविनाश नारकर देखील होते. पण या व्हिडीओचा चुकीचा वापर केल्यामुळे अनुष्का संतापली आहे.

या व्हिडीओत अनुष्का पिंपुटकर आणि अविनाश नारकर बसमध्ये दिसत आहेत. मूळात हा व्हिडीओ ‘जनक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आला होता आणि त्याच्या शेवटी फिल्मच्या रिलीजची तारीखही नमूद केली होती. पण काही लोकांनी तो शेवटचा भाग काढून टाकून फक्त बसमधील क्लिप काढली आणि ती चुकीच्या पद्धतीने शेअर केली. यामुळे अभिनेत्रीला धक्का बसला आणि ती भडकली.

अनुष्काने व्यक्त केला राग

अनुष्काने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. संताप व्यक्त करत अनुष्का म्हणाली, “माझी एक क्लिप प्रचंड व्हायरल होतेय. ती मूळ क्लिप ‘जनक’ या चित्रपटाची आहे, जी मी केली होती. आम्ही प्रमोशनसाठी ती व्हिडीओ क्लिप बनवली होती आणि जेव्हा त्या पेजने तो व्हिडीओ पोस्ट केला, तेव्हा शेवटी लिहिले होते की या दिवशी आमची ‘जनक’ नावाची फिल्म रिलीज होणार आहे. पण काही अतिशहाण्या लोकांनी ते शेवटचं काढून फक्त तो व्हिडीओ घेतला आणि तो पोस्ट केला, त्यामुळे तो व्हायरल झाला.”

ती पुढे म्हणाली की, “मी जेव्हा त्या प्रत्येक व्हिडीओच्या खालचे कॉमेंट्स वाचले, तेव्हा मला ते इतकं घाण वाटलं की, तुम्ही ज्याला ओळखतही नाही, त्याची अशी बदनामी कशी करू शकता? तुम्हाला सत्य माहिती नाहीये तरी तुम्ही इतक्या घाणेरड्या कमेंट कशा काय करू शकता? तुम्ही स्वतःच्या सोयीनुसार व्हिडीओ एडिट करून कसे टाकू शकता? हे तुम्ही कसं काय करू शकता?”

“आमची ‘जनक’ फिल्म मुळात याच विषयावर आहे की सोशल मीडियावर व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. आता मी हे खऱ्या आयुष्यात अनुभवतेय की हे खरं आहे. मी तुम्हा सगळ्यांबद्दल खूप निराश आहे. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही सगळे व्हिडीओ डिलीट करा,” असंही तिने सांगितलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language