Hashtagintro

Belgaum Cyber Fraud : ट्रक्टरची रक्कम; भामट्यांनी केली गळम

बेळगाव : उसाचे बिल आल्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी म्हणून ते बँकेतील खात्यावर शेतकऱ्याने ठेवले होते. परंतु, सायबर भामट्यांनी शेतकऱ्याचा मोबाईल हॅक करून खात्यावरील ५ लाख ७५ हजार ४६४ रुपये परस्पर वर्ग करून घेतले आहेत. वेळोवेळी रक्कम काढल्याचे मेसेज आल्याने शेतकऱ्याने जेव्हा बँकेत जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांच्या खात्यावर अवघे १९ रुपये शिल्लक असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. सोमवारी त्यांनी जिल्हा सीईएनमध्ये जाऊन फिर्याद दिली आहे.

रामाप्पा ममदापूर नामक शेतकऱ्याचे कॅनरा बँकेत खाते होते. साखर कारखान्यातून त्यांच्या खात्यावर उपरोक्त रक्कम जमा झाली होती. यातून ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्याने त्यांनी ती खात्यावर तशीच ठेवली होती. परंतु, ४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यावरील संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात आली. नेमकी रक्कम कशी गेली, याबाबत त्यांना काहीही सांगत येत नाही.

आपले बँक खाते व मोबाईल कसा व कोणती माहिती दिल्यानंतर हॅक झाला, याची त्यांना कल्पना नाही. परंतु, सायबर भामट्यांनी त्यांचे खाते हॅक करूनच ही रक्कम लाटल्याचा संशय सीईएन पोलिसांना आहे. त्यांच्या खात्यावर अवघे १९ रुपये राहिल्याने या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न उद्‌ध्वस्त झाले आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदीश्वर पुढील तपास करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language