Hashtagintro

Nashik : नाशिक महापालिकेतील राजकीय सस्पेन्स संपला ! 10 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर, महापालिकेत भाजपचे वर्चस्व

नाशिक : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर संपला आहे. न्यायालयीन लढाई, पक्षांतर्गत मतभेद आणि नियुक्ती प्रक्रियेतील विलंबानंतर आज (दि. २० नोव्हेंबर) दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

महासभेत महापौरांकडून नावांची घोषणा
आज दुपारी दोन वाजता महापालिकेची महासभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेपुढील पहिलाच विषय स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मांडण्यात आला. नगरसचिव संजय नेरकर यांनी नियुक्तीसंदर्भातील प्रस्तावाचे वाचन केले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या पक्ष आणि आघाड्यांच्या अधिकृत गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची छाननी तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली.

भाजपचे ६, तर इतर आघाड्यांचे ४ सदस्य
या नियुक्त्यांमध्ये भाजपने सर्वाधिक सहा जागा मिळवल्या आहेत. तर शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीला दोन आणि उबाठा व काँग्रेस शहर विकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत.
नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांची संपूर्ण यादी
भाजप (६)
1. अजित चव्हाण
2. हेमंत धात्रक
3. संदीप लेनकर
4. रोहिणी नायडू
5. रामहरी संभेराव
6. चंद्रशेखर पंचाक्षरी
शिवसेना-मनसे शहर विकास आघाडी (२)
1. विनायक आढाव
2. चंद्रकांत लवटे
उबाठा आणि काँग्रेस शहर विकास आघाडी (२)
1. हेमंत गायकवाड
२. बाबासाहेब गायकवाड

नवनियुक्त सदस्यांचा महासभेत सत्कार
स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी नवनियुक्त सदस्यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे अभिनंदन केले आणि सत्कार केला. दरम्यान, नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language