Hashtagintro

Maherchi Sadi Sequel: ‘माहेरची साडी 2’ बनला तर लक्ष्मी आणि विकी कोण? अजिंक्य देव यांनी सुचवली कलाकारांची नावं

Maherchi Sadi Sequel: 90च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘माहेरची साडी’ हा चित्रपट. 1991 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वाला वेगळी ओळख मिळवून दिली. चित्रपटाची नायिका लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री अलका कुबल यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतला. अलका कुबल, अजिंक्य देव, रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले आणि आशालता वाबगावकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रातील महिलांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्याकाळी चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली होती. तो चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. तब्बल 100 हून अधिक आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये सुरू होता.
माहेरची साडी या सिनेमाचा दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होत, त्याचा सीक्वेल यावा अशी अनेकांची इच्छा आहे. मधल्या काही काळात विजय कोंडके यांनी मी माहेरची साडी 2 वर काम करत आहेत असं देखील सांगितलं होतं. सिनेमाची कथा तयार आहे. तंत्रज्ञ आणि कलाकार शोधत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
https://www.prahaar.in/2026/11/21/bollywood-entertainment-news-bhaijaan-apologizes-to-shraddha-kapoor-matrubhumi-and-eetha-to-clash-at-the-box-office-on-december-4th/
या चित्रपटामुळे अभिनेता अजिंक्य देव यांच्या लोकप्रियतेतही मोठी भर पडली. चित्रपटात अजिंक्य देव यांनी लक्ष्मीच्या भावाची म्हणजेच विकीची भूमिका साकारली होती. त्यातच आता या चित्रपटाचा सीक्वल बनवला तर त्यात आजच्या काळातील कोणते कलाकार असावेत, याबद्दल अजिंक्य देव यांना एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आले.

अजिंक्य देव यांनी सांगितले ‘या’ अभिनेत्रीचे नाव
अजिंक्य देव यांनी नुकताच एका चॅनेलला मुलाखत दिली, त्यात त्यांना चित्रपटातील त्यांचे पात्र विकी आणि लक्ष्मी म्हणजेच अलका कुबल यांच्या भूमिकेत ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा सिक्वेल बनला तर कोणते कलाकार त्या पात्रासाठी योग्य असतील, असे विचारण्यात आले, त्यावर अजिंक्य देव यांनी सुबोध भावेचं नाव सुचवलं. तसंच अलका कुबल यांच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान योग्य ठरेल, असं अजिंक्य देव म्हणाले. तर खाष्ट सासूच्या भूमिकेत उषा नाडकर्णी यांचंच नाव घेतलं. “ती मला वाटतं उषाच करेल अजूनही. तिनेच करावं, तीच खाष्ट होऊ शकते,” असं अजिंक्य देव मजेशीरपणे म्हणाले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language