Hashtagintro

Bollywood Actress : बॉयफ्रेंडसोबतचं नातं फक्त दिखावा, एका रात्रीसाठी घेते लाखो रुपये, अन्…बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल डिटेक्टिव्हचा धक्कादायक दावा

Bollywood Actress : बॉयफ्रेंडसोबतचं नातं फक्त दिखावा, एका रात्रीसाठी घेते लाखो रुपये, अन्…बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल डिटेक्टिव्हचा धक्कादायक दावा

बॉलिवूडमध्ये झगमगत्या दुनियेच्या पडद्यामागे अनेक धक्कादायक गोष्टी घडत असतात. कलाकारांचे रिलेशनशिप्स, अफेअर्स आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीबाबत प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं धक्कादायक दावा केलेला. ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांसमोर आपली वेगळी प्रतिमा जपत असून तिचं बॉयफ्रेंडसोबतचं नातं केवळ दिखावा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये तिच्या करिअरमधील एका प्रकरणाबद्दल खुलासा केला. यावेळी तिनं संबंधित अभिनेत्रीचं नाव सांगितलेलं नाही. मात्र, ही अभिनेत्री बऱ्याच वर्षांपासून मनोरंजनविश्वात काम करत असल्याचं तिनं सांगितलं.

अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबतचं नातं केवळ दिखावा?

तान्या पुरीच्या दाव्यानुसार, संबंधित अभिनेत्री एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं दाखवते. मात्र, प्रत्यक्षात हे नातं केवळ लोकांसमोरची प्रतिमा जपण्यासाठी असल्याचं तिनं सांगितलं. अभिनेत्रीला आलिशान जीवनशैली जगण्याची सवय असून त्यासाठी ती एस्कॉर्ट म्हणून काम करत असल्याचा दावाही तान्यानं केला. या अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नसल्याचंही तिनं सांगितलं. एकदा तिच्या बॉयफ्रेंडनेच प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली होती. आपली गर्लफ्रेंड फसवणूक करत असल्याचा संशय त्याला होता. त्यानंतर तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं असता, तिचे अनेक पुरुषांशी संबंध असल्याचं समोर आल्याचा दावा तान्यानं केला.

एका रात्रीसाठी घेते लाखो रुपये?

तान्या पुरीनं केलेल्या दाव्यानुसार, संबंधित अभिनेत्री वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन क्लायंटसोबत वेळ घालवते. यासाठी ती मोठी रक्कम घेते. अभिनेत्रीची टीम क्लायंटसोबत करार करते. या करारात डिनरला जाणं किंवा एकत्र वेळ घालवणं अशा गोष्टींचा उल्लेख असतो. मात्र, प्रत्यक्षात हे संबंध त्यापलीकडे जात असल्याचा दावा तान्याने केला. या अभिनेत्रीच्या एका रात्रीच्या किंवा काही तासांच्या सहवासासाठी क्लायंटकडून ५ ते २० लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचंही तिनं सांगितलं. महिन्याला किमान १० क्लायंटसोबत ती वेळ घालवत असल्याचा दावा तान्यानं केला. अधिक पैसे देणाऱ्या क्लायंटसोबत ती जास्त वेळ घालवत असल्याचंही तिचं म्हणणं आहे.

बॉयफ्रेंडला सत्य समजलं, तरी नातं तोडलं नाही!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडला तिच्या कामाबद्दल माहिती मिळाल्यानंतरही त्यानं तिच्यासोबतचं नातं संपवलं नसल्याचा दावा तान्याने केला आहे. अभिनेत्री काय करते, याची माहिती तिच्या बॉयफ्रेंडला होती. मात्र, तिच्या या कामातून मिळणाऱ्या पैशांचा वापर करून दोघेही आलिशान आयुष्य जगत असल्याचं तान्यानं सांगितलं. इतकंच नव्हे, तर दोघांनी मिळून व्यवसायही सुरू केल्याचा दावा तान्यानं केला.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language