Hashtagintro

CNAP Rule: दुसऱ्याच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल तर सावधान, १ नोव्हेंबरपासून नियमात हा बदल

CNAP Rule: दुसऱ्याच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल तर सावधान, १ नोव्हेंबरपासून नियमात हा बदल

CNAP Rule: उद्या १ नोव्हेंबर पासून देशातील कोट्यवधी फोन युजर्ससाठी कॉलिंगशी संबंधित नियमात बदल होणार आहे. टेलिकॉम कंपन्या उद्यापासून देशभरातील कॉलर नेम प्रेझेंटेशन म्हणजे CNAP सर्व्हीस लागू करणार आहे. आता पर्यंत जेव्हा तुमच्या फोनवर अज्ञात व्यक्तीच्या नंबरने कॉल येत होता तेव्हा स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत होता. कॉल कोणाचा आहे हे जाणण्यासाठी आपल्या थर्ड पार्टी कॉलर आयडी ऐप्सचा वापर करावा लागत होता.

परंतू आता १ नोव्हेंबरपासून कोणत्या ऐप्सशिवाय तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवर कॉल करणाऱ्यांचे खरे नाव दिसणार आहे. दूरसंचार विभागाने वाढते सायबर फ्रॉड आणि फर्जी कॉल्सवर लगाम लावण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, या नव्या नियमामुळे त्या कोट्यवधी लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. जे आप आपल्या आई-वडीलांचे , बहिण – भावाचे वा अन्य कुटुंबियांच्या नावे घेतलेल्या सिमचा वापर करत आहेत.

दुसऱ्याच्या नावे आहे सिम,  स्क्रीनवर कोणाचे नाव येणार ?

भारतात सिमकार्ड घरातील कोणत्याही सदस्याच्या नावाने घेतलेले असले तरी ते वापरण्याचा प्रघात आहे. त्यामुळे तुम्ही नातलगाच्या नावाने खरेदी केलेले सिम वापरत असाल तर CNAP नियम लागू झाल्याने सर्वात मोठे कन्फ्युजन हे आहे की कॉल केल्यानंतर कोणाचे नाव पलिकडच्या व्यक्तीच्या फोन स्क्रीनवर दिसेल ? नियमानुसार CNAP सिस्टीम संपूर्णपणे टेलिकॉम कंपन्यांच्या केवायसी डेटाबेसवर काम करते.

त्यामुळे सिम खरेदीच्या वेळी ज्या व्यक्तीचे आधारकार्ड वा अन्य ओळखपत्र दिले असेल कंपनीच्या रेकॉर्डनुसार तोच खरा मालक आहे. त्यामुळे तुम्ही जर अन्य नातलगाच्या नावाने रजिस्टर्ड सिम वापरत असाल आणि एखाद्या अनोळखी नंबरवर कॉल करत असाल तर समोरच्याच्या स्क्रीनवर तुमचे नव्हे तर तुमच्या नातलगाचे नाव झळकेल. तर कॉल केल्यावर तुमचे नाव दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर टेलिकॉम ऑपरेटरकडे जाऊन सिमला तुमच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल किंवा पोर्ट करावे लागेल.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language