
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डोंगरी भागातील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर फिरणार आहे. इथे दाऊदच घर आणि ऑफिस आहे. याच घरात दाऊद लहानाचा मोठा झाला. इथल्या गल्लीबोळात दादागिरी करता, करता एक दिवस तो अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह बनला. दाऊदचे हे घर पाडलं जाणार आहे. मूळात ही कारवाई एकट्या दाऊदच्या घरावर नाहीय, तर भेंडी बाजार परिसरात असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही धोकादायक इमारत आहे. ती इमारतच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. दाऊद आता पाकिस्तानात वास्तव्याला आहे. या इमारतीत दाऊदचं घर आहे. याच इमारतीच्या तळ मजल्यावर प्रार्थना हॉल आणि मशीद आहे. या मशिदीवरुन आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर मशीद आहे. ही मशीद 100 वर्षे पूर्वीची मशीद आहे. सी वन कॅटेगिरीमध्ये ही मशीद येते.
मुसाफिरखाना परिसरातील मशिदीवर तोडक कारवाईचे सावट आहे. मुंबई महापालिकेकडून कारवाई संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईसंदर्भात निर्णय होईल. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. भेंडी बाजार परिसरातील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना इमारतीचा मुद्दा चर्चेत आहे. धोकादायक इमारत आणि प्रार्थना हॉलसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. मशिदीवर तोडक कारवाईचा बैठकीत निर्णय होणार. कारवाईच्या चर्चेमुळे परिसरात तणाव आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमच्या समोर येऊन चर्चा करावी
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व आहे. मशिदीवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन, आयुक्त अश्विनी भिडे काय भूमिका घेणार? आणि बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार? याकडे लक्ष आहे. ऑल इंडिया सुन्नी जमिएत उलमाचे मौलाना अमानउल्लाह रजा यांनी आक्रमक वक्तव्य केलं आहे. “इथे आमची मशीद आहे आणि आमच्याकडे याचे पुरावे आहेत. आमचं प्रार्थना स्थळ विकत घेणारे हे कोण?. इनके बाप का माल है क्या?. आमच्या समोर येऊन चर्चा करावी. आम्ही आमचे कागद घेऊन येतो” असं मौलाना अमानउल्लाह रजा म्हणाले.
Source: TV9 Marathi National
