Hashtagintro

Devendra Fadnavis: शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा नको- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: शरद पवार आजही सक्रिय आहेत. ते शेवटपर्यंत थांबणार नाहीत. ते काही ना काही करत राहतील, हा माझा विश्वास असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा निराधार आल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, हीच आमची सर्वांची सदिच्छा आहे. पवार आजही अत्यंत सक्रिय असून मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे.

ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि समाजोपयोगी कामांमध्ये रुची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आपल्या आयुष्यात कधीही थांबणार नाहीत आणि काही ना काही सकारात्मक काम करतच राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

पवार निवृत्त होणार नाहीत : सुळे

शरद पवार हे अजिबात निवृत्त होणार नाहीत. त्यांच्या राज्यसभेचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तेव्हा ते निवृत्त कसे होतील, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवेल, असेही त्या म्हणाल्या.

शरद पवार हे ८६ वर्ष पूर्ण करत असून ते येणाऱ्या १२ डिसेंबरला राजकारणातून निवृत्ती जाहीर करतील आणि त्यानंतर त्यांचा पक्ष भाजपप्रणीत ‘एनडीए’मध्ये सहभागी होईल, अशा आशयाचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यावर स्पष्टीकरण करताना सुळे यांनी संताप व्यक्त करत निवृत्तीच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन केला होता. या संभाषणावेळी मोदींनी आपण विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, असे म्हटले होते. राजकीय वर्तुळात या वक्तव्याने खळबळ उडाली होती. त्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून सुप्रिया सुळे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा वाढल्या आहेत.

सुप्रिया सुळे वेगळी भूमिका घेणार नाहीत : संजय राऊत

शरद पवार हे कुठेही जाणार नाहीत. ते इंडिया आघाडीत आहेत आणि इंडिया आघाडीसोबतच राहतील. फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार शरद पवार सोडणार नाहीत, असे सांगून खा. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language