न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्स याने भारताविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात 107 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर त्याच्यासोबतच पत्नी केट विक्टोरिया हिचीही चर्चा रंगली आहे.
ग्लेन आणि केट या दोघांनाही फिरण्याची विशेष आवड आहे. न्यूझीलंडमधील सुंदर निसर्गरम्य ठिकाणे आणि डोंगररांगांमध्ये ते अनेकदा सुट्ट्यांचा आनंद घेतात.
न्यूझीलंडमधील माउंट कुक नॅशनल पार्कच्या हुकर व्हॅली ट्रॅकवर ग्लेनने केटला प्रपोज केलं होतं. डोंगरांच्या सुंदर सानिध्यात गुडघ्यावर बसून त्याने केटसमोर प्रेम व्यक्त केलं.
ग्लेन आणि केट 2021 पासून एकमेकांना डेट करत होते. ऑगस्ट 2022 मध्ये दोघांनी साखरपुडा केला, तर 10 फेब्रुवारी 2023 रोजी क्वीन्सटाउनमधील स्टोनीब्रिज इस्टेट येथे विवाह केला.
केट विक्टोरिया ही न्यूझीलंडची रहिवासी असून प्रोफेशनल इव्हेंट प्लॅनर आणि सोशल मीडिया कोऑर्डिनेटर आहे. तिला कला, क्रिएटिव्हिटी, फिटनेस आणि फॅशनचीही विशेष आवड आहे.
ग्लेनच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतार आणि दुखापतींच्या काळात केट नेहमी त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. दोघेही एकमेकांना मोठा आधार मानतात. केट अनेकदा स्टेडियममध्ये ग्लेनला प्रोत्साहन देतानाही दिसते. (सर्व फोटो सौजन्य- ग्लेन आणि केट फिलिप्स इन्स्टाग्राम पेज)
Source: TV9 Marathi Sports






