Hashtagintro

Gutkha spitting death : गॅलरीतून गुटखा थुंकायला गेला अन थेट ११ हजार व्होल्टचा झटका बसला : मध्यप्रदेशातील वृद्धाचा शॉक लागून तडफडून मृत्‍यू!

Gutkha Spitting Death मध्यप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदीशा जिल्ह्यात गंजबासौदा येथे ही घटना घडली असून ही ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका ६० वर्षीय वृद्धाची गुटखा खाण्याची सवय जीवावर बेतली आहे. याबाबब अधिक माहिती अशी की एक वृद्ध बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत भाड्याने राहत होते त्‍यांना गुटखा खाण्याची सवय.

शुक्रवारी दुपारी असाच गुटख्याचा बार भरला चघळून झाल्यावर ते थुंकण्यासाठी गॅलरीत आले अन पिचकारी मारली याच दरम्यान तेथून जाणाऱ्या ११ हजार किलोव्हॅट विद्युत वाहिनीचा त्‍यांना स्पर्श झाला, तत्‍ळाळ विज प्रवाहित होऊन वृद्धाचा जोराचा झटका बसला. त्‍यांचा जागीच तडफडून मृत्‍यू झाला. प्रभू लाल गुप्ता असे या वृद्धाचे नाव आहे.

विजेचा झटका इतका तीव्र होता की या प्रभु लाल गुप्ता वृद्धाचा मृतदेह इमारतीच्या कठड्यालाच लटकून राहिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध एका अंडर-कन्स्ट्रक्शन इमारतीत भाड्याने राहत होते. गॅलरीतून बाहेर गुटखा थुंकण्याचा प्रयत्न करत असताना जवळूनच जाणाऱ्या ११ केव्ही विजेच्या तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि विजेच्या भीषण धक्क्याने त्यांचा जागेवरच जीव गेला. कठड्याला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकामाधीन इमारतीवरून अतिशय धोकादायक पद्धतीने ही हायटेंशन वीजवाहिनी गेली असून, ती नागरिकांच्या जिवावर बेतत आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी वीज विभागाने ही लाईन तातडीने दुसरीकडे हलवावी किंवा सुरक्षेच्या योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या बाबत पिचकारीतून विजेचा धक्का बसला आहे की थुंकताना त्‍यांचा विजवाहिनीला स्पर्श झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language