Hashtagintro

Hanuman Ansh : हनुमान अंश’मध्ये नीम करौली बाबांची भूमिका साकारली; चित्रपटाने 451 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली, पण कलाकाराच्या वाट्याला आले फक्त…

Hanuman Ansh :  हनुमान अंश’मध्ये नीम करौली बाबांची भूमिका साकारली; चित्रपटाने 451 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली, पण कलाकाराच्या वाट्याला आले फक्त…

7 ऑगस्टला सिनेमा रिलीझ झाला आणि बघता बघता त्याने 451 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाचे सगळीकडे प्रचंड कौतुक झाले. यातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या चित्रपटात अनुभवी कलाकरांची दमदार फळी देखील पाहायला मिळाली. शोभिनव सत्या यांनी मुख्य भूमिका म्हणजेच नीम करौली बाबांची भूमिका साकारली तर चंदन आनंद यांनी डॉ. रामानंदन भोसले यांची भूमिका साकारली.

जेव्हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करतात, तेव्हा कलाकारांच्या मानधनाची अनेकदा चर्चा होते.’हनुमान अंश’ चित्रपटातील अभिनेता शोभिनव सत्याने हा खुलासा केला आहे. चित्रपटात नीम करोली बाबांची भूमिका साकारणाऱ्या शोभिनवने, नुकतेच आपल्या मानधनाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर उघडपणे भाष्य केले आहे. त्याने स्पष्ट केले की, त्याला चित्रपटासाठी 15 लाख रुपये नव्हे, तर फक्त अंदाजे 1 लाख रूपये त्यांना मानधन मिळाले आहे. असे शोभिनत्व याने स्पष्ट केले.

 

 

१५ लाख रुपये फी मिळाल्याचा दावा फेटाळला

‘गेम चेंजर’ पॉडकास्टवर शोभिनव सत्याला जेव्हा विचारण्यात आले की, ‘हनुमान अंश’मधील कामासाठी त्याला 15 लाख रुपये मिळाले आहेत का?, तेव्हा त्याने हा दावा फेटाळून लावला. अभिनेत्याने सांगितले की, त्याला तेवढी रक्कम मिळाली नाही. मग पुन्हा प्रश्न करण्यात आला तेव्हा शोभिनत्व म्हणाला की मानधनाची रक्कम असं जाहीर करणं चुकीचं आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या अंदाजानुसार त्याला 1 लाख च्या आसपास अंदाजे मानधन मिळाल्याच स्पष्ट केले. त्याने सोशल मीडियावर फिरत असलेल्या कलाकारांच्या मानधनाच्या यादीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शोभिनवच्या मते, जर व्हायरल झालेली यादी अचूक असेल, तर केवळ कलाकारांचे एकूण मानधन एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. केवळ 1 कोटी 70 लाख च्या बजेटमध्ये हा चित्रपट कसा बनू शकला, हे समजणे कठीण आहे. त्याने स्पष्ट केले की, त्याच्या मानधनाबाबत ऑनलाइन प्रसारित होत असलेले आकडे वास्तवापेक्षा खूपच वेगळे आहेत. तर नेटकऱ्यांनी या कलाकाराला कमीत कमी 1 कोटी मिळायला हवे होते असे मत मांडले.

हनुमान अंश हा चित्रपट भारतात 7 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या हिंदी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती विशाल चतुर्वेदी यांच्यासह अनुप्रिया ए. नगर, नम्रता जी. सिंग आणि रागिनी सोना यांनी ‘स्वयंभू मीडिया नेटवर्क’ आणि ‘होली काऊ होम प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली केली आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language