Hashtagintro

ICC Schedule: क्रिकेटचा महासंग्राम रंगणार! 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी अन् 2031 वनडे वर्ल्ड कप भारतात; ICC ची मोठी घोषणा, तारखाही जाहीर

ICC Schedule: क्रिकेटचा महासंग्राम रंगणार! 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी अन् 2031 वनडे वर्ल्ड कप भारतात; ICC ची मोठी घोषणा, तारखाही जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी 2035 पर्यंतच्या सर्व पुरुष क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठीच्या कालावधीला मंजुरी दिली. आयसीसीने 2021 पर्यंतच्या पुरुष आयसीसी स्पर्धांसाठी यजमान देशांचीही घोषणा केली. भारताला दोन प्रमुख स्पर्धांच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले आहेत. भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2032 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले आहेत.

भारत 9 ते 28 ऑक्टोबर 2029 या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल आणि 9 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत 2031 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवेल. आयसीसीने 2031 नंतरच्या स्पर्धांसाठी यजमान देशांची घोषणा केली नसली तरी, त्यांच्या तारखा सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. भारत आणि बांगलादेश 2021 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवतील. या भव्य स्पर्धेचे सह-यजमानपद भारताला देण्यात आले आहे.

भारत 2029 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचेही आयोजन करेल. यानंतर 2035 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपदही निश्चित झाले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. तथापि, यजमान देशाची घोषणा अद्याप झालेली नाही. 2028 चा टी-20 विश्वचषक 12 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केला जाईल. पुढील स्पर्धा 2030 मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल. त्यानंतरचे टी-20 विश्वचषक 2032 आणि 2034 मध्ये आयोजित केले जातील.

या दोन स्पर्धांसाठी यजमान देश आणि ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 2035 पर्यंत दर दोन वर्षांनी जून महिन्यात खेळला जाईल. 2029 आणि 2031 मध्ये इंग्लंड अंतिम सामन्यांचे आयोजन करेल. 2033 आणि 2035 च्या अंतिम सामन्यांसाठी यजमान देशांची घोषणा अद्याप झालेली नाही. आयसीसीचे मुख्य कार्यकारी संजोग गुप्ता म्हणाले, आयसीसीच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचा संच हा जागतिक क्रिकेट पायाभूत संरचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ते पुढे म्हणाले, ते खेळाला अधिक स्पर्धात्मक बनवतात आणि संपूर्ण क्रिकेट जगताला एक चांगली दिशा व संदर्भ प्रदान करतात. खेळाडू आणि सदस्य देशांना या स्पर्धांविषयी सुयोग्य माहिती देण्याचे महत्त्व आम्ही जाणतो. यामुळे खेळाडूंचा विकास, उच्च-कार्यक्षमता कार्यक्रम आणि एक पद्धतशीर क्रिकेट वेळापत्रक यासाठी उत्तम योजना तयार करण्यास मदत होईल.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language