Hashtagintro

Ishita Dutta: अजय देवगणशी कनेक्शनमुळे चित्रपट मिळतात? ‘दृश्यम’ फेम इशिता दत्ताने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

Ishita Dutta: अजय देवगणशी कनेक्शनमुळे चित्रपट मिळतात? ‘दृश्यम’ फेम इशिता दत्ताने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या संधी आणि त्यामागील ओळखी यावर नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्री इशिता दत्ता हिच्याबाबतही असाच प्रश्न उपस्थित केला जातो. अभिनेता अजय देवगणसोबत तिने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केल्यामुळे तिला त्याच्या ओळखीचा फायदा होतो का, अशी चर्चा रंगली आहे. आता इशिताने या चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे. अजय देवगणशी असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे तिला चित्रपट मिळतात, असं काही जणांना वाटत असलं, तरी या मुद्द्याकडे ती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या चर्चांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं.

इशिता दत्ता हिने अजय देवगणसोबत ‘दृश्यम’ चित्रपटाच्या माध्यमातून काम केलं. या चित्रपटात तिने अजयच्या मुलीची, अंजू साळगावकरची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘दृश्यम 2’ आणि आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मध्येही ती याच भूमिकेत दिसली. याशिवाय ‘दे दे प्यार दे २’मध्येही दोघांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे इशिताला अजय देवगणच्या ओळखीमुळे कामाच्या संधी मिळतात, अशी चर्चा होत असते. यावर बोलताना तिने लोकांच्या मतांबद्दल नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्यांना त्यांचा दृष्टिकोन ठेवण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सूचित केलं. लोकांना आपल्या कारकिर्दीबद्दल काय वाटतं, यापेक्षा आपण काम कसं करतो, हे महत्त्वाचं असल्याची तिची भूमिका आहे.

‘दृश्यम’साठी दिली होती ऑडिशन

इशिताने स्पष्ट केलं की, तिला केवळ अजय देवगणशी असलेल्या ओळखीमुळे भूमिका मिळाल्या, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. ‘दृश्यम’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिने ऑडिशन दिली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढील भागांमध्ये तिच्या व्यक्तिरेखेची कथा सुरू राहिल्यामुळे तिला पुन्हा त्याच भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘दे दे प्यार दे 2’साठीही तिने ऑडिशन दिलं होतं. विशेष म्हणजे, ‘दृश्यम’साठी तिची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरनेच या चित्रपटासाठीही तिची निवड केली होती. त्यामुळे काम मिळण्यामागे केवळ ओळख नसून ऑडिशन आणि कास्टिंग प्रक्रियाही महत्त्वाची असल्याचं तिने सांगितलं.

इशिता दत्ता सध्या ‘दृश्यम: द कन्क्लुजन’मुळेही चर्चेत आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिच्यासाठी आवश्यक बदल करण्यात आले. तिच्या वेळापत्रकानुसार शूटिंगमध्ये सहकार्य करण्यात आलं आणि गरजेनुसार बाळालाही सेटवर आणण्याची मुभा मिळाली. या सहकार्यामुळे इशिताला आईपणाची जबाबदारी सांभाळत काम करणं सोपं झालं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language