Hashtagintro

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत चुरस वाढली; आज १२७ अर्जांची विक्री, एकूण संख्या ६३५ वर

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी (२८ ऑक्टोबर) एकाच दिवसात १२७ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या अर्जांची एकूण संख्या ६३५ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन प्रमुख राजकीय नेत्यांच्या सुपुत्रांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी अर्ज क्रमांक ५८ आणि ६० असे दोन अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांवर निंबाजी साहेबराव पाटील आणि मिराबाई संजय पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

दुसरीकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल गुलाबराव देवकर यांनी ‘इतर सहकारी संस्था’ (ड-१) मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी अर्ज क्रमांक १९ आणि ३ असे दोन उमेदवारी अर्ज सादर केले असून, रोहिदास मधुकर पाटील आणि लिलाधर सदाशिव तायडे यांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत.जिल्ह्यातील दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील वारसदारांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

२८ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारी अर्जांचा तपशील

निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार, विविध मतदारसंघांतून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ

धरणगाव तालुका : प्रताप गुलाबराव पाटील (दोन अर्ज)

चोपडा तालुका : रोहित दिलीप निकम, घनश्याम ओंकारलाल अग्रवाल, निलम शशिकांत पाटील

रावेर तालुका : राजेश गजानन वानखेडे, मंदार मनोहर पाटील

भडगाव तालुका : प्रताप हरी पाटील, पुनम प्रशांत पाटील

बोदवड तालुका : मधुकर रामचंद्र राणे, रुपेश दामोदर गांधी

इतर सहकारी संस्था मतदारसंघ (ड-१)

विशाल गुलाबराव देवकर, गोपाळ रामकृष्ण भंगाळे, निलेश सुरेश चौधरी, ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे, सुदाम शेनपडू पाटील, प्रताप हरी पाटील आणि पुनम प्रशांत पाटील.

इतर मागासवर्गीय (ओबीसी) मतदारसंघ

निलेश सुरेश चौधरी, विष्णु महादू सोनार, राजेश दत्तू पाटील, गोपाळ रामकृष्ण भंगाळे, ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे, अशोक आधार पाटील, रविंद्र पुंडलिक पाटील आणि प्रताप हरी पाटील.

महिला प्रतिनिधी मतदारसंघ

लिलाबाई सुरेश चौधरी, सारिका गोपाळ भंगाळे, निलम शशिकांत पाटील, ज्योती रविंद्र पाटील, योगिता अशोक पाटील आणि पुनम प्रशांत पाटील.

विमुक्त जाती व भटक्या जमाती मतदारसंघ

विजय रामदास पाटील, सुरेश पुना धनके, सदाशिव गणपतराव ढेकळे आणि प्रकाश देशमुख जाधव.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदारसंघ

महेंद्र बळीराम सपकाळे आणि शामकांत बळीराम सोनवणे.

निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे

उमेदवारी अर्जांच्या विक्रीत झालेली वाढ आणि विविध मतदारसंघांतून इच्छुकांनी दाखवलेला उत्साह यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच प्रमुख राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात उमेदवारांची संख्या, संभाव्य आघाड्या आणि राजकीय समीकरणे यांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेवरील सत्तेसाठी कोणते गट एकत्र येतात आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language