Hashtagintro

Jalna News: शेतात सोन्याचे सात हंडे पुरल्याची बतावणी, सुरु झाला भयंकर खेळ; अघोरी पुजेने जालन्यात खळबळ

Jalna News: शेतात सोन्याचे सात हंडे पुरल्याची बतावणी, सुरु झाला भयंकर खेळ; अघोरी पुजेने जालन्यात खळबळ

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी Jalna Aghori Puja News:  जालना जिल्ह्यामधून अघोरी पुजेचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतामध्ये सोन्याचे सात हंडे असल्याच्या संशयातून अघोरी पुजा केल्याच्या प्रकाराने जालन्यात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानंतर या सर्वांचे बिंग फुटले. याप्रकरणी शेत मालकासह नऊ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या सविस्तर….

शेतात सोन्याचे सात हंडे, अघोरी पुजा अन्… जालन्यात भयंकर प्रकार! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातल्या टकले पोखरी गावातील शेतशिवारात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय व्यक्त करत ते शोधण्यासाठी अघोरी पूजा करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेतमालकासह नऊ जणांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 11 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

टकले पोखरी गावातील शिवलाल धोंडीराम राठोड यांनी आपल्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय व्यक्त करत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही जणांना बोलावलं होतं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शेतात पूजा मांडण्यात आली. दरम्यान, रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली.

पोलिसांची कारवाई, 9 जणांवर गुन्हा दाखल! 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधितांची विचारपूस आणि झाडाझडती घेतली असता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून लिंबू, नारळ, सुपारी,बदाम,कुंकू यासह पूजेचं साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language