देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या IIT दिल्ली येथे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही भरती होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ८०,००० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांना एक वर्षासाठी ठेवलं जाईल. काम चांगलं असेल तर हा कालावधी दोन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी ही संधी असणार आहे.
पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई / बीटेक पदवी असणं गरजेचं आहे. त्यात किमान ६० टक्के गुण असावेत. पदवीनंतर संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. हा अनुभव ऑपरेशन, मेंटेनन्स, सुपरव्हिजन किंवा सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सेवांशी संबंधित असावा. १ डिसेंबर २०२६ पर्यंत उमेदवाराचं वय ४० वर्षांपेक्षा कमी असावं. या पदांसाठी निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख आणि ठिकाण याबाबत संस्थेकडून नंतर कळवलं जाईल.
https://www.prahaar.in/2026/11/17/newborns-delivered-in-municipal-corporation-hospitals-will-receive-their-birth-certificates-within-3-days/
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी आयआयटी दिल्लीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाचा नमुना घ्यावा. त्यात पदाचं नाव, स्वतःचं नाव, लिंग, वडील / पतीचं नाव, पत्ता, फोन नंबर, शिक्षण आणि अनुभवाची माहिती भरावी. खाली सही करून ठिकाण आणि तारीख लिहावी. वर पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रं स्कॅन करून चांगल्या प्रतीत पीडीएफ बनवून recruitmentcell@admin.iitd.ac.in या ई-मेलवर पाठवावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर आहे.
Source: Prahaar News
