Hashtagintro

kolhapur | शहराचा 'तिसरा डोळा' दिवसा बंद, रात्री सुरू

अशिष आडिवरेकर

कोल्हापूर : पोलिसांच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावणारे शहरातील १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था दिवसा बंद आणि रात्री सुरू अशी आहे. महापालिकेने या कॅमेऱ्यांचे लाईट मीटर अचानक बदलल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलीस दलाने याचा सर्व्हे केला असून, लवकर मीटर सुरू करण्यासाठी महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे.

शहरात २०१६ मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. याचे नियंत्रण पोलीस मुख्यालयातून करण्यात येते. सीसीटीव्हीमुळे पोलिसांना चेनस्नॅचिंग, चोरी, दरोडे अपघातासह अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होते. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवणे, वाहतुकीस शिस्त लावण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावितात. गुन्हेगारांवर सीसीटीव्हीचा वचक राहत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते; मात्र १६५ पैकी १०० कॅमेरे केवळ रात्रीच सुरू राहतात. महापालिकेने सेफसिटीच्या कॅमेऱ्यांसाठी लाईट व्यवस्था करून द्यायची आहे; मात्र १५ दिवसांपूर्वी महापालिकेने कॅमेऱ्यांना वीजपुरवठा करणारे मीटर अचानकपणे बदलल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे.

महापालिकेने स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी याची कल्पना पोलीस विभागास देणे गरजेचे होते. अचानकपणे दिवसा कॅमेऱ्याचे फुटेज दिसणे बंद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तसेच चेनस्‍नॅचिंग, दुचाकींची चाेरी यासह वेगवेगळ्या घटनांच्‍या तपासात अडथळे आहेत. पोलीस प्रशासनाने या १०० कॅमेऱ्यांची तपासणी करून काही ठिकाणी मीटरची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी नव्याने मीटर घेऊन देण्याची विनंती महापालिकेस केली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language