Hashtagintro

Kolhapur News : दसरा संपताच फुलांचे भाव मातीमोल! झेंडू-निशिगंधा १० रुपये किलो; तोडणीचा खर्चही निघेना, उत्पादक शेतकरी हवालदिल

बिरू व्हसपटे

शिरढोण : दसरा सण पार पडताच फूल बाजारात दरात मोठी घसरण झाली आहे. झेंडू आणि निशिगंधाचे दर प्रतिकिलो थेट १० रुपयांपर्यंत खाली आले असून, शेवंतीला केवळ २० रुपये किलोचा भाव मिळत आहे. बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच, तोडणीचा खर्चही निघणे मुश्कील झाल्याने फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

सणासुदीच्या काळात फुलांना चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड केली होती. मात्र, दसरा संपताच मागणी अचानक घटली असून, दुसऱ्या बाजूला बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरामध्ये ही घसरण झाली आहे. सद्यस्थितीत फुलांची तोडणी, मजुरी, खते, औषधे आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे.

फुलांचे दर पार तळाला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असून, या संकटाच्या काळात शासनाने नुकसानग्रस्त फूल उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

आवक वाढली, दर घसरले!

“सध्या बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दसऱ्यानंतर स्थानिक पातळीवर मागणी कमी झाल्याने बाजारात मंदीचे सावट पसरले असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. मागणीच्या तुलनेत अतिरिक्त आवक हेच दर घसरण्याचे मुख्य कारण आहे.”

— भारत पाटील (फूल व्यापारी, मिरज)

फुलांचे घसरलेले दर (सध्याचा दर)

  • झेंडू : १० रुपये किलो

  • निशिगंध : १० रुपये किलो

  • शेवंती : २० रुपये किलो

  • पर्पल शेवंती : ४० रुपये किलो

  • अस्तर : ४० रुपये किलो

  • गुलाब : ३० रुपये (प्रति १० नगांची पेंडी)

  • बटण गुलाब : ५० रुपये

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language