Hashtagintro

Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई: कोलकाता- मुंबई विमान अपहरणाची धमकी देण्यात आली आहे. एअर इंडिया कंपनीचं हे विमान आहे, या विमानाला हायजॅकची धमकी देण्यात आली आहे. विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. हायजॅकची धमकी मिळाल्यामुळे विमानाची सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी केली जात आहे. हे विमान कोलकात्याहून मुंबईला येत होते. विमान टेक ऑफ घेण्याच्या काही मिनिटांआधीच ही चिठ्ठी सापडल्यामुळे काही काळ विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

(बातमी अपडेट होत आहे)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language