Hashtagintro

Train Window Grill: ट्रेनच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या का असतात? काच असतानाही जाळी लावण्यामागची 4 महत्त्वाची कारणे!

Train Window Grill: भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. ट्रेनने प्रवास करताना आपण नेहमी खिडकीजवळ बसून बाहेरचे दृश्य पाहत असतो. एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का? ती म्हणजे अनेक ट्रेनच्या खिडक्यांना काचेसोबत लोखंडी जाळ्याही लावलेल्या असतात. पण अनेक लोकांना ती का लावण्यात येते हे माहिती नसते. या जाळीचा उपयोग कशासाठी होतो ? त्याचा फायदा काय?
खिडकीत आधीच काच असताना लोखंडी जाळीची काय गरज? हे केवळ प्रवाशांना बाहेर पडण्यापासून वाचवण्यासाठी आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत? खिडक्यांवरील या जाळ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनेक गरजा पूर्ण करतात. रेल्वे इंजिनाच्या खोबणीत दोना काचा असतात आणि त्यावर लोखंडी जाळी लावलेली असते. तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर हे दृश्य तुम्हाला नेहमी दिसते. इंजिनाची पुढची काच ही नेहमी लोखंडी जाळीने झाकलेली असते.
https://www.prahaar.in/2026/11/11/new-vande-bharat-route-big-news-for-vande-bharat-passengers-the-train-will-now-run-on-the-madgaon-yesvantpur-route/
लोखंडी जाळीची काय गरज?
1.जेव्हा ट्रेन जास्त वेगाने धावते. रेल्वे अनेकदा ताशी 100 ते 150 किमी वेगाने धावत असते. तेव्हा जवळच्या लहान किंवा मोठ्या वस्तू खिडकीला आदळू नयेत. कधीकधी रेल्वे रुळाच्या बाजूने येणारे दगड, खडे किंवा इतर वस्तू खिडकीवरून उसळून ट्रेनच्या खिडकीपर्यंत पोहोचतात अशा वेळी जर खिडकीची काच कमकुवत असेल किंवा आघातामुळे फुटली, तर त्याचे तुकडे आत बसलेल्या प्रवाशांना इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे एक मजबूत जाळी संरक्षणाचा अतिरिक्त थर म्हणून काम करू शकते.
2. बऱ्याचवेळा काही लोक बाहेरचे दृश्य पाहण्यासाठी खिडकीतून आपले हात, डोके किंवा मोबाईल फोन बाहेर काढतात. ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. ट्रेनच्या आजूबाजूला विजेचे खांब, सिग्नल, झाडे, प्लॅटफॉर्म आणि इतर ट्रेन्स असतात. अशा परिस्थितीत, बाहेर काढलेला हात किंवा डोके कशालातरी लागू शकते, ज्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. खिडकीच्या जाळ्या प्रवाशांना असे करण्यापासून रोखण्यास मदत करतात.
3. तसेच ट्रेनने प्रवास करताना अनेकदा मोबाईल फोन, पाण्याच्या बाटल्या, खेळणी किंवा इतर लहान वस्तू घेऊन खिडकीजवळ बसतात. ट्रेनला धक्का लागल्यास किंवा त्यांचे सामान खाली पडल्यास या वस्तू खाली पडू शकतात. मात्र, खिडकीला लावलेल्या जाळ्यांमुळे मोठ्या वस्तू खाली पडण्यापासून रोखता येते, ज्यामुळे रुळांजवळील लोकांना आणि मालमत्तेला होणाऱ्या दुखापतीचा धोका कमी होतो.
4. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यामध्ये लहान मुले, वृद्ध आणि खिडकीजवळ बसायला प्राधान्य देणाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे, प्रवासावेळी प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खिडक्यांची रचना केली जाते. जाळीमुळे खिडकीचे तोंड पूर्णपणे उघडे राहत नाही. यामुळे लहान मुलांचा, विशेषतः बाहेर वाकणाऱ्या किंवा हात पुढे करण्याचा धोका कमी होतो.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language