Hashtagintro

Lalit Prabhakar : आदित्यपासून अजमलपर्यंतचा प्रवास हा खूप…ललित प्रभाकरनं व्यक्त केल्या भावना, पोस्ट चर्चेत

Lalit Prabhakar : आदित्यपासून अजमलपर्यंतचा प्रवास हा खूप…ललित प्रभाकरनं व्यक्त केल्या भावना, पोस्ट चर्चेत

सध्या ‘प्रहार‘ या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगली असून या सिनेमात राजकुमार रावनं उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. तर ललित प्रभाकरनं अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. 26/11 मुंबई बॉम्बस्फोटवर हा सिनेमा आधारित आहे. ललितचं चाहत्यांकडून कौतुक होतंय. अशातच आता ललितनं सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. ‘प्रहार’ या चित्रपटात कसाबची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं दिग्दर्शक अविनाश अरुण धवारे, लेखक सुमित रॉय, अभिनेता राजकुमार राव यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. तसेच, आजवरच्या प्रवासात साथ दिलेल्या चाहत्यांप्रतीही त्यानं कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दिग्दर्शक अविनाश अरुण धवारे यांच्याबद्दल काय म्हणाला ललित?

ललितनं दिग्दर्शक अविनाश अरुण धवारे यांचे विशेष आभार मानले. त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आपल्यातील एका वेगळ्या व्यक्तिरेखेची क्षमता ओळखली, असं त्यानं म्हटलं. त्यांच्यासोबत काम करताना अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेण्याची संधी मिळाली. हा अनुभव कायम स्मरणात राहील आणि त्यांच्याप्रती आपण नेहमीच ऋणी राहू, अशा भावना अभिनेत्यानं व्यक्त केल्या.

लेखक सुमित रॉय यांच्या लेखनाचं केलं कौतुक

चित्रपटाचे लेखक सुमित रॉय यांच्या लेखनाचंही ललितनं कौतुक केलं. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये भावनांची खोली होती. त्यामुळे एक अभिनेता म्हणून प्रत्येक दृश्यातील भावनिक बारकावे समजून घेऊन व्यक्तिरेखा साकारता आली, असं ललितनं नमूद केलं. अभिनेता राजकुमार रावसोबत काम करणं हा आपल्यासाठी विशेष अनुभव होता, असं ललितनं म्हटलं. राजकुमार रावनं साकारलेल्या उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेमुळे आपल्याला कसाबची व्यक्तिरेखा अधिक प्रभावीपणे साकारण्याची प्रेरणा मिळाली, असंही त्यानं सांगितलं.

इतकंच नव्हे या भूमिकेसाठी आपली निवड करणाऱ्या कास्टिंग टीमचेही ललितनं आभार मानले. ‘अशी भूमिका मला मिळेल, याबद्दल मी स्वतः कधी कल्पनाही केली नव्हती.’ असं ललित म्हणाला. कसाबची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पंजाबी-उर्दू भाषेचा लहेजा आत्मसात करणं हे मोठं आव्हान होतं. मात्र, अमितोज ग्रेवाल यांच्या मार्गदर्शनामुळे आणि संयमामुळे ही व्यक्तिरेखा साकारण्यास मदत झाली. याशिवाय, कसाबचा लूक साकारण्यासाठी मेहनत घेणाऱ्या मेकअप टीमचेही आभार, असं ललित म्हणाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar)

चाहत्यांसाठी लिहिली खास पोस्ट

या पोस्टमध्ये अभिनेत्यानं आपल्या चाहत्यांसाठीही खास मेसेज दिला आहे. प्रत्येक भूमिकेतून स्वतःला आव्हान देण्याचा आणि आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं. ‘आदित्य’पासून ‘अजमल’पर्यंतचा प्रवास हा खूप शिकण्याचा, स्वतःला नव्यानं शोधण्याचा आणि अभिनयाच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रवास असल्याचं ललितनं म्हटलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language