Hashtagintro

Manoj Jarange : लोक म्हणतात ती बाई… मनोज जरांगेंचा मोठा दावा, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल नवी माहिती

Manoj Jarange : लोक म्हणतात ती बाई… मनोज जरांगेंचा मोठा दावा, 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपबद्दल नवी माहिती

तुमच्यामुळे त्यांचं आहे. त्यांच्यामुळं तुमचं नाही, मग तुम्ही का गप बसला आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे, तुम्ही घेतलेच नाही तर तुम्ही का घाबरता, आपल्यासंबंधी त्याठिकाणी विषारी षडयंत्र रचलं जात असेल तर त्याठिकाणी आपण नाही का रहावं असा सल्ला त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

तुम्ही जर हे सोडून द्याल, तर मग आणखी पुढेही काही प्लान्स आणि किती प्लान असतील हे तुम्हाला माहिती आहे का मग? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मला माझ्याबद्दल माहिती आहे, माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळं आहे. वेळ आली की फोडणार, असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

ही ऑडिओ क्लिप खरी आहे. दोघांनी तुटून पडून यातलं सत्य बाहेर काढलं पाहिजे, लोकांमध्ये शिंदे साहेबांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झालं पाहिजे. ही क्लिप काही एआय नाही, ही खरी आहे. ही खोटी नसण्याचं कारण आहे, ते म्हणजे याच्यामध्ये कोणी गरीब असते तर ते आतापर्यंत जेलमध्ये टाकले गेले असते. ते भाजपाच्यासंबंधीत आहेत. म्हणून ते जेलमध्ये टाकलेले नाहीत, गुन्हाच दाखल नाही. ही देशातली आमि राज्यातली पहिली एसआयटी अशी आहे की, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चौकशीला सुरुवात केली आहे, असं होत नाही. याचा अर्थ ते ही क्लिप खोटी ठरवणार आहेत. हा विषय लहान नाही. शिंदेंनी हा विषय किती गांभिर्यानं घेतला याची आम्हाला कल्पना नाही, पण याचे पडसाद आणि भोग भोगावे लागणार आहेत. जर हे त्याच्या मुळाशी गेले नाहीत. तर त्याचे परिणाम मात्र तळागाळातल्या, गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत, असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी शिंदेंना दिला आहे.

हसण्यावारी विषय नेला तर लहानांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचं राजकीय करिअर हळूहळू उद्ध्वस्त होईल. मला दुसरीही एक माहिती मिळाली आहे, दिल्लीतले लोक म्हणतात की, ती बाई खोटं नाही बोलू शकतं. ती बाई खूप आत्मविश्वासाने क्लिपमध्ये बोलते आहे, असंही यावेळी जरांगेंनी म्हटलं आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language