Hashtagintro

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये पुन्हा वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, दर्शनाच्या व्यवस्थेवरून भाविक आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांमध्ये वादाचे प्रकारही समोर येत आहेत. अशाच एका घटनेत भाविक आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोन दिवसांत वाद आणि मारहाणीच्या तीन घटना
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका भाविकाला सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता दिवाळीच्या गर्दीत पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने मंदिर परिसरातील परिस्थिती चर्चेत आली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत वाद आणि मारहाणीच्या तीन घटना घडल्या आहेत. यातील एका घटनेप्रकरणी महिला सुरक्षारक्षकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोबाईलवर चित्रीकरण करताना वाद
मंदिराच्या प्रांगणात घडलेल्या घटनेच्या चित्रफितीत एक पुरुष भाविक मोबाईलवरून वादाचे चित्रीकरण करताना दिसत आहे. यावेळी महिला सुरक्षारक्षकाने त्याला हटकले. या दरम्यान हाताला धक्का लागल्याने संबंधित भाविकाचा मोबाईल खाली पडला. त्यानंतर भाविक, त्याच्यासोबत असलेली महिला आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात हरियाणातील एका भाविकाला मंदिरातील सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी विश्वस्तांकडून मारहाणीचा प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला होता. काही विश्वस्तांनी संबंधित भाविक नशेत असल्याचेही म्हटले होते. मात्र, या घटनेच्या चौकशीनंतर तीन ते चार सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
https://www.prahaar.in/2026/11/12/nashik-severe-accident-involving-a-cement-carrying-truck-in-kasara-ghat-one-person-dead-11-injured/
महिला सुरक्षारक्षकाची तक्रार
या ताज्या घटनेप्रकरणी महिला सुरक्षारक्षकाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दर्शन झाल्यानंतर भाविकांना मंदिराबाहेर जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने महिला भाविकांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिला सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली
दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी या घटेनबाबत माहिती देताना सांगितले की त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना आर्किऑलॉजीप्रमाणे असून आम्ही दररोज 15 ते 18 हजार भाविकांना दर्शन देतो. अशात ज्या भाविकासोबत सुरक्षारक्षकाचा वाद झाला, त्या भाविकानं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तब्बल पन्नास मिनिटे मंदिरातील सभा मंडपात थांबून होता. अशात सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर जाण्याची विनंती केली असता त्यानं सुरक्षारक्षकांशी वाद घातला. एका महिला सुरक्षारक्षकाच्या कानशिलात लगावली. याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. महिला सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून अज्ञात भाविकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी दिली आहे.
या तक्रारीच्या आधारे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अज्ञात भाविकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language