Hashtagintro

Nashik : नाशिकच्या सातपूरमध्ये भीषण अपघात ! मशिनमध्ये डोके अडकून 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करताना मशिनमध्ये डोके अडकून २१ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुमीत रामदास सपकाळे (वय २१) असे मृत कामगाराचे नाव असून, या घटनेमुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत सपकाळे हा मूळचा पाडळसा, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी होता. तो सध्या नाशिकमधील सिडको परिसरात उत्तमनगर येथे केएसडब्ल्यू कॉलेजसमोर राहत होता.

कामादरम्यान अचानक घडली दुर्घटना
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत हा सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर गेला होता. कंपनीतील प्लांट क्रमांक २ मध्ये तो काम करत असताना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक त्याचे डोके मशिनमध्ये अडकले. या दुर्घटनेत सुमीत गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली.

सातपूर परिसरात हळहळ
अपघाताची माहिती मिळताच कंपनीतील प्रसाद शुक्ल यांनी सुमीतला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कामगाराचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कामगार वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language