Hashtagintro

Nashik Water Supply | पाणीपुरवठ्यासाठी 31 जुलैपर्यंतचे नियोजन करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एल निनोचा संभाव्य प्रभाव, सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढत्या तापमानमुळे आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी ३१ जुलै २०२७ पर्यंत पुरेल अशा पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे.

गरज भासल्यास १० टक्के किंवा त्याहून अधिक पाणीपात करावी, तसेच टंचाई कृती आराखडा तयार करावा, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास शाखेकडून सोमवारी (दि. २६) या संदर्भातील पत्र जारी करण्यात आले.

वाढत्या तापमानमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरणे, तलाव, नद्या, विहिरी आणि कूपनलिका यातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तो पिण्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवावा, असे निर्देश आहेत.

संभाव्य टंचाईच्या काळात आवश्यकतानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित कराव्यात, तसेच नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती करावी. उपलब्ध पाण्याचे समान वितरण करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करून पाणीपुरवठ्यातील बदल आणि कपातीबाबत नागरिकांना आगाऊ सूचना द्याव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत पाणीपुरवठाच्या कामांना प्राधान्य द्यावे. संबंधित अधिकारी आणि कर्मचारांनी मुख्यालयी उपस्थित राहून अत्यावश्यक कारणाशिवाय रजा घेऊ नये, असेही निर्देश आहेत. सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.

गळती, चोरी रोखण्याचे निर्देश

पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती, फुटलेल्या जलवाहिन्या आणि नादुरुस्त व्हॉल्व्ह तातडीने दुरुस्त करावेत. अनधिकृत नळजोडण्या आणि पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. बांधकामे, वाहने धुणे, बागबनिचे आणि सार्वजनिक सौंदर्यीकरणासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language