Hashtagintro

Nivedita Saraf: ‘तिथे डोकं ठेवलं अन् त्याच क्षणी..; निवेदिता सराफ यांचा अक्कलकोटचा अनुभव ऐकून स्वामीभक्तांचेही डोळे पाणावतील

Nivedita Saraf: ‘तिथे डोकं ठेवलं अन् त्याच क्षणी..; निवेदिता सराफ यांचा अक्कलकोटचा अनुभव ऐकून स्वामीभक्तांचेही डोळे पाणावतील

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवेदिता सराफ यांनी श्री स्वामी समर्थांचं अर्धनारीश्वर रुप धारण केल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. स्वामींच्या रुपातील निवेदिता सराफ यांचा फोटो पाहून अनेकांचे डोळ्यात पाणी आले. निवेदिता सराफ स्वत: एक स्वामी भक्त आहेत.  यानिमित्ताने निवेदिता सराफ यांनी अक्कलकोटमधील एक भावूक करणारा प्रसंग बोलून दाखवला. तो सांगताना त्यांच्या डोळ्यात आपसुक अश्रू अनावर झाले.

अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना निवेदिता सराफ यांनी सांगितले की, “मी माझ्या पतीमुळे अशोकमुळे स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली. कारण त्या आधी मला त्यांच्याविषयी विशेष इतकी माहिती नव्हती. का कोण जाणे मला एकदा अशोकनी सांगितले की ते सहा वर्ष स्वामींची भक्ती करत आहेत. जवळजवळ त्यांनी नॉनव्हेज वगैरे पण सोडले होते. एकदा मला वाटतं कुठल्यातरी चित्रिकरणाच्या दरम्यान ते सोलापूरत होते आणि ते म्हणाले, “मी सहा वर्षांचं व्रत केले आणि त्याचं मी समर्पण करतोय. मला मंदिरात जाऊन पोथी वाचायचीये.  त्यांचे एक निर्माते होते सतीश कुलकर्णी त्यांच्यासोबत अशोक गेले. विश्वास बसणार नाही पण एक चिटपाख्रू नव्हतं काकड आरतीच्यावेळेला मंदिरात. ही सत्य गोष्ट आहे. त्यांनी बसून पूर्ण अध्याय वाचला.”

निवेदिता सराफ यांनी पुढे सांगितले की, “हे ऐकल्यानंतर मी म्हटले मला तो ग्रंथ वाचायचा आहे. मग मी तो ग्रंथ घेतला आणि वाचला. नंतर मी स्वतः अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला दोन मठ आहे, एक वटवृक्ष मठ आहे आणि एक समाधी मठ. स्वामींनी खाली जाऊन समाधी घेतली आधी मी तिकडे गेले,  मी सांगूच शकत नाही मला तेव्हा काय वाटलं ते”. मला बोलताना सुद्धा भरून येत आहे आणि हे अश्रू श्रद्धेचे आहेत. हे कुठल्याही दुःखाचे नाहीयेत किंवा आनंदाचेही नाहीयेत. मी तिकडे गेले, त्या समाधी मठाच्यामध्ये जी चांदीची कमान आहे, त्या पायरातनं स्वामी खात्रीने मी असे डोकं ठेवले की मला वाटलं मी घरी आले.”

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language