Hashtagintro

Panchayat: ‘सचिव जी’ हे काय केलंत? ‘पंचायत’च्या शूटिंगनंतर गावाची केली अशी अवस्था, नेमकं काय घडलं?

Panchayat: ‘सचिव जी’ हे काय केलंत? ‘पंचायत’च्या शूटिंगनंतर गावाची केली अशी अवस्था, नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून पंचायत ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पाचव्या सिझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका कारणामुळे या सीरिजची चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या सेटवरचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

पंचायत ही सीरिज पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी चर्चा थोडी नकारात्मक आहे. खरे तर एका सोशल मीडिया युजरने पंचायतच्या शूटिंगनंतर गावाची अवस्था दाखवली आहे. गावात ठिकाण-ठिकाणी पसरलेली घाण दाखवत त्या व्यक्तीने दाखवले की, काम संपताच तिथली स्थिती कशी झाली. शूट संपल्यावर गावात स्वच्छता करायची सोडून आणखी कचरा करुन क्रू तेथून निघून गेला आहे. अनेक ठिकाणी खायचे पॅकेट पडले आहेत, पेपरचा कचरा पडला आहे अशा अनेक गोष्टी गावाच्या रस्त्यावर पडलेल्या दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivam Chaudhary (@ishivamchaudhary)

नेटकरी संतापले

शिवम चौधरी नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने गावाचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “पंचायतचे शूटिंग संपले. पण आपल्या मागे हे काय सोडून गेले?” या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सच्या खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसत आहेत. एकाने लिहिले, “मंजू देवीच्या राज्यात असे होत नसे.” तर एका युजरने द वायरल फीवरला टॅग करत लिहिले की, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.” सोशल मीडियावर कोणीतरी व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला तर व्हिडिओ शेअर करणाऱ्या इन्फ्लुएंसरने स्पष्ट केले की, हा व्हिडिओ २४ नोव्हेंबर २०२६ चा आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण इतके नक्की आहे की, यामुळे सोशल मीडिया युजर्सना कमेंट करण्यासाठी भरपूर मसाला मिळाला आहे.

पंचायत सीरिजविषयी

सांगितले जात आहे की, पंचायतचा पाचवा सीझन ४ डिसेंबरला अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. ट्रेलरवरून असे वाटत आहे की, इतर अनेक मुद्द्यांपासून वेगळे यावेळी फोकस सचिव जी आणि रिंकी यांच्या लव्ह स्टोरीवरही असेल. शेवटी तो लग्नासाठी हात मागण्यासाठी प्रधान जींच्या घरी पोहोचणार आहे. आता लग्न या सीझनमध्ये होईल की यासाठी पुन्हा सहाव्या सीझनची वाट पाहावी लागेल हे स्पष्ट नाही.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language