Hashtagintro

Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची परंपरा कायम! यंदाची दिवाळी सुद्धा सुरक्षा दलातील जवानांसोबत केली साजरी…

नवी दिल्ली: देशभर उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे आपली परंपरा कायम राखत यंदाची दिवाळी सुरक्षा दलातील जवानांसोबत साजरी केली. कार्तिक अमावस्येच्या मुहूर्तावर त्यांनी छत्तीसगडमधील संवेदनशील आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या बस्तर येथे जाऊन जवानांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतला. या संदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून देशवासीयांसोबत शेअर केली.
https://www.prahaar.in/2026/11/08/kanpur-hit-and-run-case-thar-vehicle-hits-a-young-man-riding-a-scooter-the-youth-dies-on-the-spot/
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर लिहिले की, “दिवाळीच्या पवित्र प्रसंगी बस्तरला जात आहे. कालपर्यंत जिथे नक्षलवाद्यांचा हैदोस होता, तिथे आज विकासाची लाट आली आहे. वीर जवानांना, त्यांच्या असीम बलिदानाला, त्यागाला आणि खडतर तपश्चर्येला नमन करण्यासाठी मी जात आहे.” पंतप्रधानांच्या या भूमिकेने पुन्हा एकदा सैनिकांप्रति असलेला त्यांचा आदर आणि देशाची सुरक्षा यंत्रणांप्रती असलेली कटिबद्धता स्पष्ट केली आहे. बस्तरसारख्या नक्षलग्रस्त भागात जाऊन जवानांसोबत सण साजरा करणे हा सैनिकांचे मनोधैर्य उंचावणारा मोठा निर्णय मानला जात आहे.

#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्तीसगढ़ के बस्तर में सुरक्षाकर्मियों के साथ दिवाली मनाई।
प्रधानमंत्री मोदी ने कहा, “आज, पूरे देश में और दुनिया के हर कोने में, करोड़ों भारतीय रोशनी के इस पावन पर्व को मना रहे हैं। लोग अपने घरों को लौटने के लिए दूर-दूर से यात्रा कर रहे हैं। यह परिवारों और अपनों के एक साथ आने और जश्न मनाने का एक बेहतरीन अवसर है। मैं भी आपके बीच दिवाली मनाने आया हूं। जो लोग सीमाओं पर और देश के भीतर राष्ट्र की रक्षा करते हैं, जो देश के रक्षक हैं और भारत माता के वीर बेटे-बेटियां हैं, आप सभी मेरे परिवार के सदस्य हैं।”

(सोर्स: डीडी)

— ANI_HindiNews (@AHindinews) November 8, 2026

या विशेष दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या संदेशात त्यांनी सर्वांच्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, “देशभरात राहणाऱ्या माझ्या सर्व कुटुंबीयांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!”
https://www.prahaar.in/2026/11/07/shocking-firing-incident-over-a-dispute-regarding-parking-and-a-dog-former-senior-official-killed/
दरम्यान, आज देशभरात दिवाळीचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. घराघरांमध्ये दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून मंदिरे पणत्यांनी व आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आली आहेत. एकीकडे संपूर्ण देश आनंदाच्या रंगात न्हाऊन निघाला असताना, दुसरीकडे देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करून पंतप्रधानांनी देशवासीयांसमोर एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. एकेकाळी जिथे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज दुमदुमायचा, तिथे आज विकासाचे दिवे उजळत असल्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language