Hashtagintro

Pradeep Purnekar Case : ठेकेदाराकडून माजी महापौर शिंदेंना आलिशान गाडीचे गिफ्ट ?

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या वापरत असलेल्या दीड कोटी किमतीच्या गाडीची चौकशी करण्याची मागणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे. कंत्राटदाराकडून व्होल्वो गाडीची भेट घेणाऱ्या शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी केल्याने शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठाकरे गटाचे शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची ५० तासांपेक्षा अधिक चौकशी पोलिसांनी केली असून राम पूर्णेकर यांनी नवनवीन पुरावे पोलिसांना सादर करण्याचा सपाटा लावला आहे.

राजेंद्र शिंदे यांना खुनातील पाचवा आरोपी म्हणून अटक करण्यासाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि विरोधी पक्षांनी आवाज बुलंद केला आहे. अशा परिस्थितीत आज सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक तक्रार केली आहे. त्या तक्रारीत मीनाक्षी शिंदे यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गान संपत्ती कमावल्याची तक्रार केली आहे. शिंदे दाम्पत्यांनी सर्व मालमत्ता पाच कोटी असल्याचे जाहीर केले असताना दीड कोटीची गाडी कसे वापरत आहेत, असा प्रश्न जेया यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.

सदरची व्होल्वो गाडी ठाणे महापालिकेच्या कंत्राटदाराकडून शिंदे यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी भेट म्हणून घेतलेली असून ती कांचन कन्स्ट्रक्शन संबंधित कंत्राटदार प्रमोद पवार यांच्या नावावर गाडी असल्याचा दावा जेया यांनी तक्रारीत केला आहे. त्याचे पुरावे सादर करीत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे आरोप सिद्ध झाल्यास गुन्हा दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे.

पडताळणी करण्याची मागणी

मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या नावावरील वाहनांच्या रकान्यात निरंक अशी नोंद केली आहे. गाडीचा खरेदी खर्च कोणी केला? ती कोणाच्या ताब्यात होती? आणि ती शिंदे यांना भेट म्हणून देण्यात होती का? याची पडताळणी करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे माजी महापौर शिंदे यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language