Hashtagintro

Rajesh Khanna : दिवसभर सिगारेट…शेवटच्या दिवसात एकटे पडलेले राजेश खन्ना, आलेली पश्चातापची वेळ; निर्मात्याचा खुलासा

Rajesh Khanna : दिवसभर सिगारेट…शेवटच्या दिवसात एकटे पडलेले राजेश खन्ना, आलेली पश्चातापची वेळ; निर्मात्याचा खुलासा

राजेश खन्ना यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी असा काळ आणि अशी प्रसिद्धी अनुभवली, जी त्यांच्या आधी किंवा नंतरच्या कोणत्याही अभिनेत्याला अनुभवता आली नाही. मात्र, आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर राजेश खन्ना यांना अचानक एका कठीण काळाला सामोरं जावं लागले. आता, चित्रपट निर्माते के.सी. बोकाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, निर्मात्यांकडे दुर्लक्ष केल्याचा राजेश खन्ना यांना पश्चात्ताप होत होता. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना पूर्णपणे एकटं वाटत होतं.

राजेश खन्ना यांना झालेला पश्चाताप

के.सी. बोकाडिया यांनी अलीकडेच एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दलही सांगितलं. के.सी. बोकाडिया यांनी सांगितलं की, राजेश खन्ना यांनी त्यांना रात्रीच्या जेवणासाठी घरी आमंत्रित केलं होतं. राजेश खन्ना यांनी स्वतः के.सी. बोकाडिया यांच्यासाठी आपला आवडता पदार्थ बनवला होता. के.सी. बोकाडिया म्हणाले, ‘त्यावेळी मी मद्रासमध्ये राहत होतो. त्यांनी मला मोठ्या आदरानं घरी बोलावलं आणि सांगितलं, ‘बोकाडिया सर, मी तुमच्यासाठी कढी आणि गट्ट्याची भाजी बनवली आहे.’ बोकाडिया पुढे म्हणाले, ‘ते सिंहासारखे धाडसी होते, पण ते त्रास सहन करत होते. ते म्हणाले, ‘बोकाडिया सर, ही माझी चूक आहे, मी निर्मात्यांकडे दुर्लक्ष केलं. आज मला त्याची शिक्षाही मिळाली आहे.”

पुढे मुलाखतीत, चित्रपट निर्मात्याला विचारण्यात आलं की, राजेश खन्ना यांना काय त्रास होत होता, काय झालं होतं? यावर के. सी. बोकाडिया म्हणाले, ‘शेवटच्या दिवसांत त्यांना कोणीही भेटायला यायचं नाही. ते लिंकिंग रोडवरील ऑफिसमध्ये दिवसभर उभे राहायचे. दिवसभर सिगारेट ओढायचे.’

दरम्यान, राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ या काळात सलग १७ हिट चित्रपट देऊन सुपरस्टारचा दर्जा मिळवला. मात्र, त्यांना हे यश टिकवता आलं नाही. या दिग्गज अभिनेत्याचं १८ जुलै २०१२ रोजी मुंबईत कॅन्सरमुळे निधन झालं. राजेश खन्ना यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language