Hashtagintro

Ratnagiri News : खेडमध्ये घरफोड्या; दागिने, रोकड लंपास

खेड : खेड तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरू असून, आंबडस खोतवाडी आणि शिव बुद्रुक मोहल्ला येथे झालेल्या दोन घरफोड्यांत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या, गॅस सिलिंडर आणि धातूची भांडी असा एकूण सात लाख ८२ हजार २५० रुपयांचा ऐवज लंपास केला. दोन्ही घटनांमध्ये घरांचे मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे अशोक रघुनाथ जाधव (वय ५८) यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख लंपास केले. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ ते २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ या कालावधीत ही घरफोडी झाली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचा लक्ष्मीहार, डिझाईनदार नेकलेस, पिळ्याची चेन, कर्णफुले, कानपट्टी वेल, नक्षीदार रिंग, बदामपान, सोन्याची अंगठी, वाघनखं, चांदीचा कमरेचा छल्ला आणि चांदीची अंगठी यांचा समावेश आहे.

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले

अहमद महम्मद परकार (५६) यांच्या मावस भावाच्या व शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्याच्या दोन चेन, प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या कानातील तीन जोड पळ्या आणि पाच हजार रुपये रोख चोरून नेले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language