Hashtagintro

Rohit Pathare Murder Case : एसपींना फोन,नोकरीची चर्चा ; रामदास आठवलेंनी घेतली रोहित पठारेच्या कुटुंबाची भेट!

वैजापूर : रोहित पठारे प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच सोमवारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पठारे कुटुंबाची भेट घेतली. केवळ सांत्वन करून न थांबता त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना फोन लावत गुन्ह्याची माहिती घेतली. कुटुंबीयांच्या तक्रारी मांडत प्रकरणात कलमांची वाढ करण्याच्या सूचनाही केल्या. दुसरीकडे, रोहितच्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी नोकरीपासून घरापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

आठवले यांच्या भेटीदरम्यान पठारे कुटुंबीयांनी रोहितला न्याय मिळावा,अशी मागणी करत निवेदन दिले. कुटुंबीयांची व्यथा ऐकल्यानंतर आठवले यांनी तत्काळ पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. गुन्ह्याच्या तपासाची माहिती घेत कुटुंबीयांच्या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले. तसेच प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेऊन गुन्ह्यात योग्य त्या कलमांची वाढ करण्याबाबत सूचना केल्या.

रोहितच्या पश्चात कुटुंबासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक प्रश्नांवरही आठवले यांनी लक्ष केंद्रित केले. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत रोहितची पत्नी आणि भावाच्या रोजगाराबाबत चर्चा केली. यावेळी रोहितच्या पत्नीचा नोकरीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली. पठारे कुटुंबाला स्वतःची जागा आणि घर उपलब्ध करून देण्याचा विषयही यावेळी उपस्थित झाला. यावर नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी पुढाकार घेत जागा आणि घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारली.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, बाबासाहेब पगारे, राजवीर त्रिभुवन, जाकीर पठाण आदी उपस्थित होते.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language