
गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड सुरू आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार हे पार्टी लाईनपेक्षा वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र दौऱ्यातून त्यांनी मोठी चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. नागपूरमध्ये रोहित पवार यांनी एक गोपनीय बैठक घेतल्याची माहिती यापूर्वी आली होती. आता या नवीन दाव्यामुळे राष्ट्रवादीसमोर पक्षातील बंड थोपवण्याचे मोठे आव्हान आहे.
बातमी अपडेट होत आहे….
Source: TV9 Marathi National
