Hashtagintro

Ruby-throated Hummingbird | हजारो मैलांचा प्रवास करणाऱ्या ‘रुबीथ्रोट’चा दुर्दैवी अंत

लंडन : सायबेरियाच्या विशाल जंगलातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या एका अतिदुर्मीळ गाणाऱ्या पक्ष्याचा (साँगबर्ड) एका पाळीव मांजराने शिकार केल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘सायबेरियन रुबीथ्रोट’ प्रजातीचा हा पक्षी ब्रिटनमध्ये क्वचितच आढळतो.

ब्रिटनमधील कम्ब्रिया भागातील ब्रॅम्प्टन येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पाळीव मांजराने या मृत पक्ष्याला पकडून घरात आणले. पक्ष्याच्या चोचीखाली असलेला आकर्षक नारिंगी-लाल रंगाचा पिसांचा पट्टा पाहून त्या महिलेने या पक्ष्याचा मृतदेह फ्रीजरमध्ये जपून ठेवला आणि पक्षी संस्थेशी संपर्क साधला. १९७५ ते २०२२ या ४७ वर्षांच्या काळात ब्रिटनमध्ये या पक्ष्याच्या अस्तित्वाच्या केवळ १७ नोंदी झाल्या आहेत. युरोपियन रॉबिन पक्ष्याशी साधर्म्य असलेला हा पक्षी अतिशय लाजाळू आणि लपून राहणारा असतो.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language