Hashtagintro

Sangli Theft : गोंधळेवाडीत बंद घर फोडून साडेचार लाखांची चोरी

जत : गोंधळेवाडी (ता. जत) येथे बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि तांब्या-पितळेची भांडी असा एकूण ४ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली असून, याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजया अण्णासाहेब धुमाळ (वय ६५, रा. बागडेबाबा मंगल कार्यालयाजवळ, संख-गुड्डापूर रोड, गोंधळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच या कालावधीत त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे लॉक तोडून आतील ऐवज लंपास केला.

चोरीस गेलेल्या मुद्देमालात एक तोळ्याचे मंगळसूत्र, सोन्याची बोरमाळ, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, तीन तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याची कर्णफुले, दोन तोळ्यांची सोन्याची चेन, २० हजार रुपयांची रोख रक्कम यांसह तांब्याची भांडी, पाणी गरम करण्याचा बंब, पितळी पाणीपिंप, हंडा, परात व पातेल्याचा समावेश आहे. याप्रकरणी उमदी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language