Hashtagintro

Sania Mirza: टेनिस अकॅडमीच्या जागेवर सानिया मिर्झा बांधतेय मशीद? व्हायरल फोटोवर वडील स्पष्टच म्हणाले..

Sania Mirza: टेनिस अकॅडमीच्या जागेवर सानिया मिर्झा बांधतेय मशीद? व्हायरल फोटोवर वडील स्पष्टच म्हणाले..

Sania Mirza: भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या एका व्हायरल बातमीमुळे चर्चेत आली आहे. सानियाने हैदराबादमधील स्वतःच्या जमिनीवर मशीद बांधण्यासाठी जागा दान केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. विशेष म्हणजे, या जागेवर आधी टेनिस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना होती, असाही दावा करण्यात आला. या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचाही एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र, आता सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या सर्व दाव्यांमागचं सत्य स्पष्ट केलं आहे. त्यांनी हे वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं सांगत व्हायरल फोटोही एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे.

सानियाच्या वडिलांनी काय सांगितलं?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सानिया मिर्झाने मशीद बांधण्यासाठी जमीन दान केल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. यानंतर इम्रान मिर्झा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. सानियाबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट असल्याचं त्यांनी म्हटलं. इम्रान मिर्झा यांनी स्पष्ट केलं की, ज्या जागेवर सानिया मिर्झा टेनिस अकॅडमी उभारण्यात आली आहे, त्या जागेवर कोणतीही मशीद बांधली जात नाही. तसंच सानिया आणि मोहम्मद अझरुद्दीन हे मशीद बांधकामाचं भूमिपूजन करत असल्याचा दावा करणारा फोटोदेखील खोटा आहे. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

सानियाच्या वडिलांची पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Imran Mirza (@imranmirza58)

इम्रान मिर्झा यांनी आपल्या पोस्टमध्ये सानियाच्या सामाजिक आणि धर्मादाय कार्याबद्दलही महत्त्वाचं विधान केलं. सानियाने यापूर्वी केलेलं, सध्या करत असलेलं किंवा भविष्यात करणारं कोणतंही सामाजिक कार्य ही तिची वैयक्तिक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. सानियाने स्वतः त्याबद्दल माहिती दिलेली नसताना इतर कोणालाही तिच्या सामाजिक कार्याबद्दल सार्वजनिकपणे बोलण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच सानिया किंवा तिच्या कुटुंबाने खरेदी केलेल्या जमिनीचा वापर कसा करायचा, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार तिला असल्याचंही इम्रान यांनी नमूद केलं.

सानियानेही वडिलांची पोस्ट केली शेअर

या संपूर्ण प्रकरणावर सानिया मिर्झाने स्वतः कोणतंही स्वतंत्र सविस्तर वक्तव्य केलेलं नाही. मात्र, तिने वडील इम्रान मिर्झा यांनी दिलेलं स्पष्टीकरण आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांवर तिनेही अप्रत्यक्षपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, सानिया मिर्झा 2023 मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाली. सहा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारी सानिया आजही भारतीय क्रीडा विश्वातील लोकप्रिय नाव आहे. सध्या ती ‘Serving It Up with Sania’ या यूट्यूब शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language