Hashtagintro

Satara News : अवघ्या जिल्हाभर दसऱ्याचा माहोल

सातारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसऱ्याचा सण मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. त्यासाठी अवघा सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. यंदा अष्टमी व नवमी तसेच नवमी व दसरा एकत्रित आला. त्यामुळे मंगळवारी शस्त्रपूजन होणार आहे. जिल्ह्यात दसऱ्याचा माहोल तयार झाला असून सीमोल्लंघनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शाहुनगरीतील शाही दसरा रद्द करण्यात आल्याने यावर्षी साध्या पद्धतीने तो होणार आहे. दरम्यान, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांच्या दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन आज मंगळवारी होणार आहे.

यावर्षी नवरात्रौत्सव दहा दिवसांचा साजरा होत असून मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सीमोल्लंघनाने नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. खंडेनवमीला गावोगावच्या ग्रामदैवतांचे मंगळवार घट उठणार असून घरोघरी शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. राजधानी, सातारा येथे साजरा होणारा शाही दसरा दुष्काळामुळे रद्द करण्यात आला आहे. विजयादशमीनिमित्त सातारा शहरात प्रतिवर्षी होणारे सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन सायंकाळी जलमंदिर पॅलेस येथे साधेपणाने होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत धार्मिक विधी पार पडतील.

  • शस्त्रपूजेसह दसऱ्याच्या पूजेतही झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठीदेखील शेवंती, निशीगंध, ॲस्टर, गुलाबासह झेंडूच्या पाकळ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. त्यामुळे सातारा शहरात पोवई नाका, झेडपी चौक, राजपथ, राजवाडा परिसर, भाजी मंडई व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झेंडूच्या फुलांचे ढीगच ढीग विक्रीसाठी आल्याने शहर व परिसरात पिवळी, केशरी रंगछटा झळकली. मागणी व आवक वाढली तरी झेंडूची फुले ५० ते ६० रुपये किलोने विकली जात होती.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language