Hashtagintro

Shopping : अतिशय स्वस्त दरात मिळतात ट्रेंडी कपडे हवेत, ‘या’ मार्केटमध्ये सहज मिळतील

Shopping : अतिशय स्वस्त दरात मिळतात ट्रेंडी कपडे हवेत, ‘या’ मार्केटमध्ये सहज मिळतील

Shopping : मुलींचा सर्वात आवडता विषय म्हणजे शॉपिंग… मुली कायम शॉपिंग करण्यासाठी नवीने मार्केट शोधत असतात. तर मुंबईत असे अनेक मार्केट आहेत जिथे तुम्हाला, पारंपरिक कपडे आणि वेस्टर्न कपडे अगदी कमी भावात मिळतील, त्यासाठी तुम्हाला फक्त दुकानदाराशी बार्गेनींग करता आली पाहिजे. मुलींना शॉपिंग करण्यासाठी मुंबईत असे काही मार्केट आहेत जिथे स्वस्त, मस्त आणि ट्रेंडी कपडे मिळतात. जर तुम्हाला मुंबईत ट्रेंडी कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज स्वस्त दरात मिळणारे बाजार शोधायचे असतील तर काही मार्केटमध्ये नक्की जा… जेथे तुम्हाला चांगले आणि स्वस्त कपडे मिळतील…

हील रोड – वांद्रे येथील हे मार्केट फार प्रसिद्ध आहे. वेस्टर्न कपडे, कॅज्युअल व पार्टी वेअर, फूटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीझसाठी तरुणी मार्केटमध्ये जातात. या भागात फार इतकी गर्दी नाही, त्यामुळे काहीशी शांत वातावरणात खरेदी करता येते. ट्रेंडी पण बजेटमध्ये कपडे हवे असल्यास हा एक चांगला पर्याय आहे. लांबून मुली या मार्केटमध्ये येत असतात.

फॅशन स्ट्रीट – याठिकाणी तब्बल 150-300 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. जेथे तुम्हाला ट्रेंडी टी-शर्ट्स, जीन्स, पार्टी वेअर, कॅज्युअल कपडे खूप स्वस्त दरात मिळतील… पण काही वेळा क्वॉलिटी चेक करणं फार महत्त्वाचं आहे. काही कपडे फक्त काही दिवस वापरण्यासाठी असू शकतात.

लोखंडवाला मार्केट – मुंबईमधील लोखंडवाला मार्केट देखील फार मोठं मार्केट आहे. याठिकाणी महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील कपडे, फोन अक्सेसरीज मिळतात. येथे तुम्हाला अतिशय स्टायलिश कपडे मिळू शकतात याठिकाणी मुलांसाठीही खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला खरेदीसोबतच खाण्यापिण्याची आवड असेल तर येथे तुम्ही स्वादिष्ट खाद्यपदार्थ

चोर बाजार – या मार्केट इतर मार्केटच्या तुलनेत इथल्या वस्तू थोड्या महाग असतील, पण तुम्हाला इथे मिळणाऱ्या गोष्टी इतर कोणत्याही मार्केटमध्ये मिळणार नाहीत. येथे तुम्हाला होम डेकॉरसाठी लागणारे दिवे, फोटो फ्रेम्स, फर्निचर आणि अशा अनेक गोष्टी मिळतील. ज्यामुळे तुमचं घर अधिक आकर्षक वाटेल…

क्रॉफोर्ड मार्केट – क्रॉफोर्ड मार्केट जवळपास 150 वर्ष जुनं मार्केट आहे. या मार्केटमध्ये कपडे आणि फॅशनच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध नाही. तर या मार्केटमध्ये स्वयंपाकघर आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टी, होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येईल.

लिंकिंग रोड – या मार्केटमध्ये कपडे, बूट्स, बॅग्स, अ‍ॅक्सेसरीज सगळं काही कमी दरात आणि व्यवस्थित मिळतं. बजेट मधल्या दरात पण ट्रेंडी वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. जर तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल आणि जीनस, टॉप्स, कॅज्युअल वेअर शोधत असाल, तर हा मार्केट खूप चांगला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language