मराठमोळा अभिनेता सुमित राघवन हा त्याच्या स्पष्ट वक्तव्यासाठी विशेष ओळखला जातो. तो सामाजिक विषयांवर स्पष्टपणे बोलताना दिसतो. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. नुकताच सुमित राघवने आयुष्यातील एका सगळ्यात जवळच्या प्रिय जीवाला गमावले असल्याचे म्हटले आहे.
सुमित राघवनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये सुमितने पाळीव श्वान राजा त्याला सोडून गेल्याचे म्हटले आहे.
सुमितने राजाचा फोटो शेअर करत “आम्ही माफी मागतो. आम्हाला माफ कर. आम्ही सगळे प्रयत्न केले राजा, माय जान….” असे कॅप्शन दिले आहे. सुमितने राजासोबतच्या फोटोंचे एक रिल देखील शेअर केले आहे.
सुमितने या पोस्टमध्ये पुढे, “माझ्या मुला, माझ्या शिफू, आमच्या बाळा. अखेर तू मुक्त झालास. जे काही तू सहन करत होतास, त्या सगळ्या वेदनांमधून तू मुक्त झालास” असे म्हटले आहे.
आज तू हे जग सोडून गेला असशील, पण आमच्या हृदयातून कधीच जाणार नाहीस. रन फ्री, माय स्वीट बॉय. आमचं प्रेम कायम तुझ्यासोबत आहे” असेही सुमितने पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकांनी सुमित राघवनच्या या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





