Hashtagintro

Swara Bhasker : त्या माणसानं मला…दिग्दर्शकाकडून लैंगिक छळ, स्वरा भास्करनं सांगितला प्रसंग

Swara Bhasker : त्या माणसानं मला…दिग्दर्शकाकडून लैंगिक छळ, स्वरा भास्करनं सांगितला प्रसंग

स्वरा भास्करनं 2011 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाचा खुलासा केला आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, स्वरानं धक्कादायक खुलासा केला आहे. स्वरानं सांगितलं की, तिनं ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटात काम केलेलं. तिच्याकडे वैयक्तिक टीम किंवा इंडस्ट्रीमध्ये कोणतेही संपर्क नव्हते, ज्यामुळे तिला आउटडोअर शूटिंगदरम्यान अत्यंत असुरक्षित वाटत होतं.

स्वरा भास्करनं सांगितला प्रसंग

स्वरा म्हणाली की, ‘मी वेगळ्याच प्रकारे असुरक्षित होते. माझ्याकडे माझी स्वतःची टीम नव्हती आणि मदतीसाठी कोणाकडे जावं असं कोणी नव्हतं.’ स्वरानं सांगितलं की, सुरुवातीला तिला दिग्दर्शकाचं वर्तन लैंगिक छळ म्हणून ओळखता आलं नाही, कारण त्यात कोणताही शारीरिक संपर्क नव्हता. अभिनेत्री म्हणाली, ‘त्या माणसानं मला स्पर्शही केला नव्हता, त्यामुळे त्यावेळी मला हे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आहे हे कळलं नाही.’ अभिनेत्रीनं स्पष्ट केलं की, #MeToo चळवळीनंतर, जेव्हा तिनं इतर महिलांचे अनुभव वाचले, तेव्हा तिला समजलं की तिनं काय सहन केलं होतं. स्वरा म्हणाली, ‘मला वाटलं, अरे देवा, हा लैंगिक छळ आहे! हे लैंगिक छळाचं एक उत्तम उदाहरण आहे.’

चित्रपटाचं शूटिंग ५६ दिवस चालणार होतं आणि लैंगिक छळ शूटिंगच्या पहिल्या काही दिवसांतच सुरू झाला. अभिनेत्री म्हणाली, ‘मला तो प्रोजेक्ट सोडायचा नव्हता. मला माझं काम गमवायचं नव्हतं. माझ्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत, बरोबर? आणि ते योग्यच आहे. मी तसा विचार का करणार नाही?’ तिनं शेवटी चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह निर्मात्याला या परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यानंतर छळ करणाऱ्या दिग्दर्शकाला समजही देण्यात आलेली. एक्झिक्युटिव्ह निर्मात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना स्वरा म्हणाली, ‘ते खऱ्या अर्थानं माझे मित्र झाले. त्यानं माझं संरक्षण केलं. त्यावेळीही ते माझ्यासोबत होते आणि आजही ते माझे मॅनेजर आहेत.’

 

‘लोकांशी बोला, मदत मागा, पाठिंबा मिळवा आणि चुकीच्या वागणुकीविरोधात लगेच आवाज उठवा. कारण आता आपण हे करू शकतो’ असं आवाहन स्वरानं तरुण अभिनेत्रींना केलं आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language