सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे अनेकांचा कल हा सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे असतो. पण मिडल इस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होताना दिसतो.
आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागतो.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ४७ हजार ८४ रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात १ हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर २ लाख ३ हजार ९४० रुपये झाले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi National





