ऐन दिवाळीच्या वेळी जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आता जळगावात दिवाळीनंतर सलग सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज देखील मोठी घसरण झाली आहे.
जागतिक घडामोडींमुळे सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम होत असल्याची चित्र आहेत. पण सोने आणि चांदीच्या दरात होणारी घसरण ही दिलासादायक आहे.
आज एका दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
10 ग्रॅम सोन्याचे दर आज जीएसटी सह एक 1 लाख 35 हजार 960 रुपयांवर आले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख 74 हजार 70 रुपयांवर पोहोचले आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi National





